
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेच्या दुसऱ्या डावात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला. यामुळे भारताच्या वाटेला पहिल्यांदा फलंदाजी आहे. भारताने पहिल्या दिवशीच्या दोन सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. केएल राहुल 2 धावांवर बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि करुण नायर यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 80 धावांची भागीदारी केली. करुण नायर 31 धावांवर असताना ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वालने आक्रमक बाणा कायम ठेवला होता. त्याला रोखणं इंग्लंडसाठी खूपच महत्त्वाचं होतं. कारण त्याचं मैदानात असणं संघासाठी त्रासदायक ठरणार होतं. यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने माईंड गेम खेळला. यशस्वी जयस्वालला आपल्या भावना ताब्यात ठेवणं कठीण होतं. अनेकदा हे चित्र पाहीलं गेलं आहे. स्टोक्सने यशस्वी जयस्वालला डिवचलं आणि बरोबर चक्रव्यूहात अडकवलं.
यशस्वी जयस्वाल मैदानात पाय रोवून व्यवस्थित खेळत होता. त्याचं लक्ष विचलीत करण्यासाठी बेन स्टोक्सने त्याला काहीतरी म्हणाला. भारताच्या डावाच्या 17 व्या षटकात बेन स्टोक्स आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात शाब्दिक चमकम झाली. बेन स्टोक्स स्वतः गोलंदाजी करत असताना जयस्वालला काहीतरी बोलला. त्यानंतर यशस्वी जयस्वालनेही त्याला उत्तर दिलं.
Some heated JAISBALL 🆚 BAZBALL on display! 👀#ENGvIND 👉 2nd Test, Day 1 | LIVE NOW on JioHotstar ➡ https://t.co/g6BryBoy3Y pic.twitter.com/ZJWy1ir2ih
— Star Sports (@StarSportsIndia) July 2, 2025
भारतीय डावाच्या 46 व्या षटकात स्टोक्स त्याच्या प्लानमध्ये यशस्वी झाला. त्याच्या षटकात यशस्वी जयस्वालने नको ती चूक केली. स्टोक्सने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि विकेटकिपरच्या हाती झेल गेला. यशस्वीचे शतक हुकले आणि 87 धावा करून तो बाद झाला. शुबमन गिल 107 चेंडूत 13 चौकार मारून 87 धावांवर बाद झाला. त्याचं शतक अवघ्या 13 धावांनी हुकलं.
Jaiswal swings at one outside off and nicks it to Jamie Smith!
Ben Stokes loved that one ❤️
🇮🇳 1️⃣6️⃣1️⃣-3️⃣ pic.twitter.com/1utciXOvgF
— England Cricket (@englandcricket) July 2, 2025
दरम्यान, भारताने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या डावात भारताने 200 पार धावा केल्या आहेत. शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांची जोडी मैदानात जमली आहे. शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या गोलंदाजांना संकटात आणलं आहे. आता या जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.