IND vs ENG : टीम इंडियाने मालिका सुरु असताना कर्णधार बदलला, पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची शिक्षा
भारत आणि इंग्लंड यांच्यात पुरुष संघ कसोटी, महिला संघ टी20 आणि अंडर 19 संघ वनडे मालिका खेळत आहे. भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यातच कर्णधार बदलण्याची वेळ आली आहे. असा अचानक घेतलेला निर्णय पाहून क्रीडाप्रेमींनाआश्चर्याचा धक्का बसला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट मालिका सुरु आहे. भारत आणि इंग्लंड पुरुष संघात दुसरी कसोटी मालिका सुरु आहे. याच दरम्यान भारत आणि इंग्लंड अंडर 19 संघात वनडे मालिका सुरु आहे. तर महिला संघ टी20 मालिका खेळत आहे.भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु असताना भारतीय संघाच्या कर्णधाराला संघातून डावलण्यात आलं आहे. तसेच कर्णधारपदाची धुरा दुसऱ्या खेळाडूच्या खांद्यावर देण्यात आली आहे. आयुष म्हात्रेच्या खांद्यावर अंडर 19 संघाची धुरा होती. मात्र त्याला तिसऱ्या वनडे सामन्यात बसवलं आहे. बुधवारीपासून बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये भारत इंग्लंड यांच्यात कसोटी सामना सुरु असातना नॉर्थम्पटनमध्ये दोन्ही देशाच्या अंडर 19 संघ तिसरा वनडे सामना खेळत आहे. पावसामुळे हा सामना सुरु होण्यास विलंब झाला. पण हा सामना सुरु झाल्यानंतर आयुष म्हात्रेला संघातून डावललं होतं. मालिकेदरम्यान असं काही घडल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडूच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात आयुष म्हात्रेने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला अचानक डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याला डावलण्याचं कारण काय? याबाबत बीसीसीआयकडू काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. काही जणांच्या मते खराब फॉर्ममुळे त्याला संघातून बाद केलं असावं. कारण या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 21 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता.
तिसऱ्या सामन्यात कर्णधार असलेल्या कुंडूने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला म्हणून हा सामना 50 ऐवजी 40 षटकांचा होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. पहिला सामना भारताने जिंकला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर/कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, हरवंश पंगालिया, कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, दीपेश देवेंद्रन, हेनिल पटेल, नमन पुष्पक
