IND vs ENG : इंग्लंडने टॉस जिंकला, कॅप्टन रोहित शर्माच्या मनासारखं झालं, टीम इंडियाची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

India vs England 3rd Odi Toss And Playing 11 : इंग्लंडने या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस जिंकला आहे. टीम इंडिया या सामन्यात पहिले बॅटिंग करणार आहे.

IND vs ENG : इंग्लंडने टॉस जिंकला, कॅप्टन रोहित शर्माच्या मनासारखं झालं, टीम इंडियाची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
shubman gill and rohit sharma team india
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 12, 2025 | 1:25 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून मालिकेवरही नाव कोरलं आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 3 मिनिटांनी टॉस झाला. पु्न्हा एकदा इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाला मोठा झटका

टीम इंडियाने मालिका जिंकली असल्याने या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल अपेक्षित होते. त्यानुसार टीम इंडियात 2 बदल करण्यात आले आहेत. तर एक जण दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता. मोहम्मद शमी याच्या जागी अर्शदीप सिंह याचा समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजाऐवजी कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे.तर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी हा दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर याला संधी मिळालीय. वरुण उजव्या पायाच्या दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया हँडलवरुन दिली आहे.

टीम इंडिया हॅटट्रिक करणार?

दरम्यान टीम इंडियाला हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्यासह इंग्लंडला क्लिन स्वीप करण्याची दुहेरी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसमोर भारत दौऱ्याची विजयाने सांगता करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्याचा निकाल काय लागतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाची बॅटिंग, किती धावा करणार?

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस एटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद