IND vs ENG: चेंडू न टाकताच दीप्ती शर्माने काढली लास्ट विकेट, इंग्लंडची टीम शॉकमध्ये

IND vs ENG: अशा पद्धतीने आऊट झाल्यानंतर फलंदाज चार्ली डीनच्या डोळ्यात पाणी

IND vs ENG: चेंडू न टाकताच दीप्ती शर्माने काढली लास्ट विकेट, इंग्लंडची टीम शॉकमध्ये
ind vs eng
Image Credit source: Screengrab
| Updated on: Sep 25, 2022 | 8:30 AM

मुंबई: टीम इंडियाने शनिवारी शेवटच्या वनडे सामन्यात इंग्लंडला हरवलं. तीन मॅचच्या वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप केलं. प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात हा सामना खेळला गेला. भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच इंग्लिश भूमीवर क्लीन स्वीपची कमाल केली. टीम इंडियाने 16 धावांनी शेवटचा वनडे सामना जिंकला. भारतीय महिला टीमसाठी हा विजय खास आहे. पण या मॅचच्या शेवटी जे घडलं, त्याची सर्वाधिक चर्चा आहे.

एक नवीन वाद

टीम इंडियाची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच इंग्लंडची शेवटची विकेट काढली. त्यावरुन आता नवीन वाद सुरु झाला आहे. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी आता या विकेटवरुन टीका-टिप्पणी सुरु केलीय.

दीप्ति शर्माने दिली चुकीची शिक्षा

शनिवारी सीरीजमधला शेवटचा वनडे सामना खेळला गेला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 169 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडची वाट लावून टाकली. इंग्लंडकडून चार्ली डीन या युवा फलंदाजाने चांगली बॅटिंग केली.

तिने शेवटच्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली होती. इंग्लंडला विजयासाठी फक्त 17 धावांची गरज होती. त्यावेळी दीप्ती शर्माने चार्ली डीनला तिच्या चुकीची शिक्षा दिली व सामना जिंकला.

कितव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला

44 व्या ओव्हरमध्ये दीप्ती चौथा चेंडू टाकण्यासाठी स्टम्पसजवळ पोहोचली. त्यावेळी नॉन स्ट्राइक एन्डवरुन चार्ली डीनने क्रीज सोडला होता. ती क्रीजच्या पुढे निघून गेली होती. दीप्तीने लगेच आपला रन-अप थांबवून बेल्स उडवल्या. डीनला तिने रनआऊट केलं.

आयसीसीच्या नियमांना धरुन

मैदानावरील अंपायर्सनी तिसऱ्या अंपायरला विचारलं. निर्णय भारताच्या बाजूने लागला. दीप्तीच्या या हुशारीने भारताने सामना जिंकला व मालिकेत क्लीन स्वीप विजयाची नोंद केली. क्रिकेटमध्ये याला ‘मांकडिंग’ म्हटलं जातं. अशा प्रकारे रनआऊट करणं, हे आयसीसीच्या नियमांना धरुन आहे. त्यामुळे अंपायर्सनी चार्लीला आऊट दिलं.

रविचंद्रन अश्विनकडून कौतुक

आता इंग्लिश क्रिकेटपटू यावर आगपाखड करतायत. हे खेळ भावनेला धरुन नाही, असं त्यांच म्हणणं आहे. दीप्तीने जेव्हा अशा पद्धतीने रनआऊट केलं, तेव्हा संपूर्ण इंग्लिशन ड्रेसिंग रुमला शॉक बसला, मैदानावर चार्लीला सुद्धा आपले अश्रू आवरता आले नाहीत. नेहमीच ‘मांकडिंग’ला योग्य ठरवणाऱ्या रविचंद्रन अश्विनने सुद्धा दीप्तच कौतुक केलय.