IND vs ENG 4th T20: मालिका पराभवाचं सावट, नाणेफेकीनंतर श्रेयस अय्यर प्लेइंग 11 बाबत म्हणाला…

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना होत आहे. हा सामना टीम इंडियासाठी करो या मरोची लढाई आहे. हा सामना गमावला तर मालिका पराभव होणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर सर्वांचं लक्ष हे प्लेइंग 11 कडे होतं.

IND vs ENG 4th T20: मालिका पराभवाचं सावट, नाणेफेकीनंतर श्रेयस अय्यर प्लेइंग 11 बाबत म्हणाला...
IND vs ENG 4th T20: मालिका पराभवाचं सावट, नाणेफेकीनंतर श्रेयस अय्यर प्लेइंग 11 बाबत म्हणाला...
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 09, 2026 | 9:52 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी20 सामना ब्रिस्टोलच्या काउंटी ग्राउंडवर होत आहे. हा सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. कारण हा सामना टीम इंडियासाठी करो या मरोची लढाई आहे. या मालिकेतील तीन सामन्यानंतर इंग्लंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका विजयाची संधी टीम इंडियाच्या हातून गेली आहे. आता मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. असं असताना हा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धची मालिका गमावली आहे. आता इंग्लंडविरुद्धची मालिका गमवण्याचं सावट आहे. दरम्यान, या सामन्यातही नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्ही त्यांची निर्भयता पाहिली, पण आम्हाला आमच्या योजना प्रत्यक्षात आणता येत नाहीत. मुले उत्साहात आहेत. आम्हाला खेळाची जाणीव ठेवून पटकन परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. डावपेचांच्या बाबतीत आम्हाला सज्ज राहावे लागेल. खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही दोन बदल केले आहेत. वॉशिंग्टन आणि प्रसिद्ध गोलंदाजीसाठी आले आहेत.’

 काय म्हणाला हॅरी ब्रूक?

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की, आम्ही फलंदाजी केली असती. इथे गवत छान, एकसारखे पसरले आहे. आमच्यात खूप चांगला संवाद होता आणि सांघिक कामगिरीही खूप चांगली होती. मालिका जिंकणे खूप छान वाटेल. आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत. लियाम डॉसनच्या जागी रेहान संघात आला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

भारत (प्लेइंग इलेव्हन) : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

Follow Us