IND vs ENG: टीम इंडियाला टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात लोळवण्यासाठी इंग्लंड सज्ज, अशी आहे प्लेइंग 11

आयर्लंडकडून टी20 मालिकेत धोबीपछाड मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. इंग्लंडविरुद्ध 1 जुलैपासून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग 11 जाहीर केली आहे.

IND vs ENG: टीम इंडियाला टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात लोळवण्यासाठी इंग्लंड सज्ज, अशी आहे प्लेइंग 11
टीम इंडियाला टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात लोळवण्यासाठी इंग्लंड सज्ज, अशी आहे प्लेइंग 11
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 30, 2026 | 10:18 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 1 जुलै 2026 पासून सुरू होत आहे. या मालिकेतील पाहिल्या सामन्यासाठी इंग्लंडच्या निवडकर्त्यांनी अधिकृत प्लेइंग 11 जाहीर केली आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ डरहमच्या चेस्टर ले स्ट्रीट येथे होणाऱ्या सामन्यात लढत देणार आहे. या प्लेइंग 11 मधून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दुसरी टी20 मालिका खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयर्लंडमध्ये टी20 मालिका खेळला होता. या मालिकेत भारतीय संघाला 2-0 ने व्हाईटवॉश मिळाला. त्यामुळे इंग्लंडचा पेपर वाटतो तितका सोपा नाही. भारतीय फलंदाजांना त्यांच्या खेळण्याच्या शैलीत बदल करावा लागेल, कारण इंग्लंडमधील परिस्थिती आयर्लंडमधील परिस्थितीसारखीच असेल. उलट आता अधिक चांगल्या व अनुभवी खेळाडूंचा सामना करावा लागेल.पहिल्याच सामन्यात पराभवाची मरगळ झटकण्याचं आव्हान टीम इंडियावर असणार आहे. कारण इंग्लंडने मजबूत प्लेइंग 11 जाहीर केली आहे. त्यामुळे हा पेपर भारतासाठी वाटतो तितका सोपा नसेल, हे नक्की.

इंग्लंडने प्लेइंग 11 जाहीर करताना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत जोफ्रा आर्चरला पहिल्या सामन्यात आराम दिला आहे. त्याच्या गैरहजेरीत वेगवान गोलंदाजी धुरा डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वूड आणि साकिब महमूदच्या हातात असणार आहे. तर फिरकीची जबाबदारी अनुभवी आदिल राशिद आणि अष्टपैलू लियाम डॉसन सांभाळणार आहे. या सामन्यात ओपनिंगला स्टार यष्टीरक्षक जोस बटलर आणि फिल सॉल्ड उतरतील. तर कर्णधार हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, टॉम बँटन आणि विल जॅक्स हे मधल्या फळीची धुरा सांभाळतील. तर सॅम करन अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणार आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग 11: फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद, ल्यूक वूड.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us