AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027: न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडला मोठा धक्का, टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेतून आऊट

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2025-2027 स्पर्धेत इंग्लंडची सुमार कामगिरी सुरूच आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपच्या अंतिम फेरीतून इंग्लंड संघ बाद झाला आहे.

WTC 2027: न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडला मोठा धक्का, टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेतून आऊट
WTC 2027: न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडला मोठा धक्का, टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेतून आऊटImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Jun 30, 2026 | 6:26 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचं इंग्लंडचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडने 2-1 ने गमावली आणि स्वप्न भंग झाला. खरं तर या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सलग दोन पराभव पचवावे लागले आणि मालिकेसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपच्या अंतिम सामन्यातून पत्ता कट झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन पराभव आणि आयसीसीच्या दंडामुळे इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर फेकला गेला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल आयसीसीने इंग्लंडवर तब्बल 12 गुणांचा दंड ठोठावला आहे. या मालिकेत एकूण 14 गुणांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे आता उर्वरित सामने हे फक्त औपचारिकता असणार आहे. कारण इतर सामन्यात विजय मिळवला तरी विजयी टक्केवारीत हवी तशी सुधारणा होणार नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप गुणतालिकेतील अव्वल दोन संघांना अंतिम फेरी खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे या दोन स्थानावर इंग्लंडचं पोहोचणं शक्य नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप गुणतालिकेत इंग्लंडची विजयी टक्केवारी 26.36 टक्के आहे. त्यामुळे उर्वरित नऊ सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरी गाठणं कठीण आहे. कारण अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 87.50 टक्के, तर दुसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 75 टक्के आहे. यात थोडंफार वर खाली झालं तरी फार काही घसरण होणार नाही. त्यात न्यूझीलंड आणि भारताला टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. इंग्लंडने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले, तर त्यांची गुणांची टक्केवारी केवळ 57.94% असेल.

भारतीय संघ अंतिम फेरी गाठेल का?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 स्पर्धेत भारताचे नऊ सामने शिल्लक आहेत. यात श्रीलंकेविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला नऊ पैकी किमान 7 सामने जिंकणे अनिवार्य आहे. पण हे गणित पण जर तर वर असेल. दुसरीकडे, 8 सामने जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 68.52 टक्के होईल, जे अंतिम फेरीचे तिकीट निश्चित करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असेल. दक्षिण आफ्रिका 75 टक्के आणि न्यूझीलंड 72.22 टक्क्यांसह सध्या भारताच्या पुढे आहेत. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी या दोनपैकी किमान एका संघाने आगामी मालिका गमावणे गरजेचे आहे. म्हणजेच न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली तर संधी असेल. पण गमावली तर मात्र कठीण आहे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार