मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून, त्यासंदर्भात पक्षाच्या हायकमांडसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील अनेक नेत्यांचा काँग्रेसकडे ओढा वाढत आहे. विशेषतः धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर विश्वास ठेवणारे आणि महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, अशा इच्छुक नेत्यांशी पक्षाचा संवाद सुरू असून, या संदर्भात काँग्रेस हायकमांडशीही चर्चा सुरू आहे. योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल आणि पुढील राजकीय घडामोडी स्पष्ट होतील, असेही त्यांनी सूचित केले.
वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 30, 2026 05:20 PM
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?