IND vs IRE: शोएब अख्तर कोण? स्पीडोमीटरने दाखवला भुवनेश्वर कुमारच्या चेंडूचा वेग ताशी 208 किमी

भारताने काल आयर्लंड विरुद्धचा (IND vs IRE) पहिला टी 20 सामना जिंकला. दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हार्दिक पंड्या या सीरीजमध्ये भारताचं नेतृत्व करतोय.

IND vs IRE: शोएब अख्तर कोण? स्पीडोमीटरने दाखवला भुवनेश्वर कुमारच्या चेंडूचा वेग ताशी 208 किमी
भुवनेश्वर कुमार
Image Credit source: social
| Updated on: Jun 27, 2022 | 11:57 AM

मुंबई: भारताने काल आयर्लंड विरुद्धचा (IND vs IRE) पहिला टी 20 सामना जिंकला. दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हार्दिक पंड्या या सीरीजमध्ये भारताचं नेतृत्व करतोय. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी 12 षटकांचा खेळवण्यात आला. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाऊस पुन्हा येण्याची शक्यता होती. पण सामना सुरु झाल्यानंतर पुन्हा पाऊस आला नाही. आयर्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 12 ओव्हर्समध्ये चार बाद 108 धावा केल्या. आयर्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. कॅप्टन अँडी बालर्बिनी (Andy Balbirnie) शुन्यावर आऊट झाला. पॉल स्टर्लिंगने (4) धावा केल्या. गॅरीथने (8) धावा केल्या. पहिल्या चार ओव्हरमध्येच तीन विकेट गेल्या.

भुवनेश्वरने दोन्ही बाजूला चेंडू स्विंग केला

भुवनेश्वर कुमारने आयर्लंडमधल्या वातावरणाचा चांगला फायदा करुन घेतला. त्याने दोन्ही बाजूला चेंडू स्विंग केला. त्यानेच आयर्लंडचा कॅप्टन अँडी बालर्बिनीला बाद केलं. भुवनेश्वर कुमारने नेहमीप्रमाणे या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने तीन ओव्हर्समध्ये 16 धावा देऊन एक विकेट काढली. एका निर्धाव षटकही त्याने टाकलं. एकाबाजूला भुवनेश्वर कुमारने प्रभावी गोलंदाजी केली. त्याचवेळी चेंडूचा वेग दाखवणाऱ्या स्पीडोमीटरमुळे सोशल मीडियाला चांगलीच उत्तेजना मिळाली. स्पीडोमीटरने भुवनेश्वरकुमार प्रतितास 200 किमी पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत असल्याचं दाखवलं. एकदा नाही, दोनचा स्पीडोमीटरवर तेच दिसलं. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

काय 208 किमी प्रतितास वेगाने चेंडू

भुवनेश्वरने पहिलाच चेंडू 201 किमी प्रतितास वेगाने टाकल्याच स्पीडोमीटरने दाखवलं. त्याच षटकात भुवनेश्वरने पुन्हा 208 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकल्याचं दाखवलं. स्पीडोमीटरमधल्या तांत्रिक बिघाडामुळे हे झालं. सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर आहे. त्याने 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.

आयर्लंडकडून कोणी शानदार खेळ दाखवला?

आयर्लंडनं 12 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरीनं शानदार फलंदाजी करताना नाबाद 64 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 9.2 षटकांत तीन गडी गमावून 111 धावा करून सामना जिंकला. दीपक हुडा 29 चेंडूत 47 धावा करून नाबाद राहिला आणि दिनेश कार्तिकने 4 चेंडूत 5 धावा केल्या. या विजयासह टीम इंडियानं आयर्लंडविरुद्ध 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना मंगळवारी होणार आहे.