टीम इंडिया Vs न्यूजीलंड, 1st ODI, Live Streaming: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना

| Updated on: Nov 24, 2022 | 7:03 PM

Ind Vs NZ, 1st ODI: मॅच किती वाजता सुरु होणार, कुठे पाहता येणार जाणून घ्या एका क्लिकवर

टीम इंडिया Vs न्यूजीलंड, 1st ODI, Live Streaming: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
Shikhar-Dhawan
Image Credit source: BCCI
Follow us on

ऑकलंड: न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज जिंकल्यानंतर टीम इंडियाच लक्ष वनडे सीरीजवर आहे. सीरीजचा पहिला सामना शुक्रवारी ऑकलंडमध्ये खेळला जाईल. भारताचा नियमित कॅप्टन रोहित शर्माला या सीरीजसाठी विश्रांती देण्यात आलीय. वनडे सीरीजसाठी शिखर धवनकडे टीमच नेतृत्व आहे. टी 20 सीरीजप्रमाणे वनडेमध्येही युवा खेळाडूंना संधी दिली जाईल.

न्यूझीलंडची टीम आपल्या बेस्ट प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचे पाच सिनियर खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा या सीरीजमध्ये खेळत नाहीयत. काही खेळाडूंना विश्रांती, तर काही दुखापतीमुळे खेळत नाहीयत.

म्हणून ही सीरीज भारतासाठी महत्त्वाची

टीम इंडियाला 2020 साली न्यूझीलंडने वनडे सीरीजमध्ये 3-0 ने हरवलं होतं. त्यावेळी विराट कोहली टीमचा कॅप्टन होता. टीम हा भूतकाळ विसरुन नव्याने सुरुवात करेल. भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपला आता फक्त 11 महिने उरले आहेत. त्या दृष्टीने न्यूझीलंड विरुद्धची ही सीरीज महत्त्वाची आहे.

कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना

कधी खेळला जाणार भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना ?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन वनडे सामन्याची सीरीज होणार आहे. पहिला सामना मंगळवारी 25 नोव्हेंबरला होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना कुठे खेळला जाणार?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये खेळला जाणार.

कधी सुरु होणार भारत-न्यूझीलंडमध्ये पहिली वनडे मॅच ?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीजचा पहिला सामना सकाळी 7 वाजता सुरु होईल. टॉस सकाळी 6.30 वाजता उडवला जाईल.

भारत-न्यूझीलंडमध्ये पहिल्या वनडे मॅचच लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?

भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे मॅचच लाइव्ह टेलीकास्ट दूरदर्शनवर होणार आहे.

भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार?

भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग एमेजॉन प्राइमवर होणार आहे.