IND vs NZ : याला म्हणतात दहशत, 260 धावा ठोकून पण मनात होती पराभवाची भीती, न्यूझीलंडचा कॅप्टन सँटनरची प्रामाणिक कबुली

न्यूझीलंडने भारतासमोर 260 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं, तरी कर्णधार मिचेल सँटनर विजयाबाबत पूर्णपणे आश्वस्त नव्हता. भारतीय फलंदाजीची ताकद पाहून त्याच्या मनात नेमकी कोणती भीती होती? सामन्यानंतर त्याने यामागचं कारण सांगितलं.

IND vs NZ : याला म्हणतात दहशत, 260 धावा ठोकून पण मनात होती पराभवाची भीती, न्यूझीलंडचा कॅप्टन सँटनरची प्रामाणिक कबुली
Mitchell Santner After Match Comment
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 10:03 PM

भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी20 सामना प्रचंड चर्चेत आला आहे. या सामन्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. या सामन्यामध्ये भारत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 87 धावांनी पराभूत झाला आहे. या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 259 धावांचा डोंगर उभा केला. ग्लेन फिलिप्सने वादळं आणलं. त्यांच्या शतकी खेळीवर किवीच्या संघाने भारतासमोर विजयासाठी 260 धावांचे लक्ष्य ठेवले. एवढी मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर मात्र विजयाबाबत पूर्णपणे आश्वस्त नसल्याचं वक्तव्य त्यानं केलं. भारतीय संघाची फलंदाजी पाहता एवढ्या धावा पुरेशा ठरतील की नाही, अशी चिंता त्याला सतावत होती. सामन्यानंतर त्याने याबाबत भाष्य केलं.

260 धावा करूनही विजयाची खात्री नव्हती

मिचेल सँटनरने सांगितले की, भारतासारख्या मजबूत फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध खेळत असताना केवळ मोठी धावसंख्या उभारून चालत नाही. त्या धावसंख्येचा बचाव करणंही तितकंच गरजेचं असतं. किंबहूना त्यासाठी गोलंदाजांना अचूक मारा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. खासकरुन पॉवरप्लेमध्ये विकेट मिळाल्यामुळे भारतावर दबाव निर्माण करण्यात मोठे यश मिळाले.

Loading...

पॉवरप्लेमधील विकेट ठरल्या निर्णायक

सँटनरच्या पुढे सांगितले की, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी खेळपट्टीचा अंदाज लवकर घेतला. सुरुवातीला बॉल बॅटवर चांगल्या प्रकारे येत होता. मात्र, योग्य टप्प्यावर गोलंदाजी केल्यास विकेट मिळू शकतात, हे गोलंदाजांनी ओळखले. त्यानुसार त्यांनी टप्पा आणि दिशा कायम ठेवली. पॉवरप्लेमध्ये विकेट मिळणे हा सामन्यातील महत्त्वाचा टप्पा होता.

ब्रेसवेलच्या फटकेबाजीचेही कौतुक

मायकेल ब्रेसवेलने केलेल्या आक्रमक फलंदाजीचेही सँटनरने खास कौतुक केले. ब्रेसवेलने अवघ्या 25 चेंडूंमध्ये 65 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे न्यूझीलंडला 220 धावांच्या आसपास असलेली धावसंख्या 260 च्या जवळ नेणे शक्य झाले. दुसरीकडे ग्लेन फिलिप्सने 49 चेंडूंमध्ये 107 धावांची खेळी केली. भारताला या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकांत 9 बाद 172 धावाच करता आल्या. न्यूझीलंडने हा सामना 87 धावांनी जिंकला. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी 3-1 अशी झाली आहे. दरम्यान, पुढील शेवटचा सामना हा 1 नोव्हेंबर रोजी रविवारी खेळवला जाणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us