
आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेचं जेतेपद मिळवण्याची मोठी संधी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला चालून आली आहे. आता या संधीचं सोनं करण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियानंतर सर्वाधिक त्रास कोणी दिला असेल तर तो न्यूझीलंडने.. चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 स्पर्धा असो की पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप..दोन्ही अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारताच्या स्वप्नांवर पाणी टाकलं आहे. आता पुन्हा एकदा भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आतापासूनच धाकधूक लागून आहे. भारताने या स्पर्धेच्या साखळी फेरीत न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारताला अंतिम फेरीत हा पेपर वाटतो तितका सोपा नसेल असं दिग्गज सांगत आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात आपलं सर्वस्वी पणाला लावावं लागणार आहे. इतकंच काय तर या सामन्यात नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा ठरणार आहे.
रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग निवडताना हार्षित राणाला संघाबाहेरच ठेवेल असं दिसत आहे. कारण मागच्या दोन सामन्यात भारताने फिरकीच्या जोरावर चांगली कामगिरी केली आहे. इतकंच काय तर वरुण चक्रवर्ती चांगला फॉर्मात आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे रोहित शर्मा पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये वरुण चक्रवर्तीला स्थान देईल यात काही शंका नाही. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड हे संघ वनडे सामन्यात 119 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 61, तर न्यूझीलंडने 50 वेळा विजय मिळवला आहे. तर 7 सामन्यांचा निकाल लागला नाही. एक सामना बरोबरीत सुटला आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , मोहम्मद शमी , कुलदीप यादव , वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग 11: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन , डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क.