IND vs NZ 2025 Final : टीम इंडियाच ‘चॅम्पियन्स’, न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात, 25 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर

India vs New Zealand Icc Champions Trophy 2025 Final Match Result : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण पाचवा विजय ठरला.

IND vs NZ 2025 Final : टीम इंडियाच चॅम्पियन्स, न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात, 25 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर
ct 2025 winner team india
Image Credit source: Icc X Account
| Updated on: Mar 10, 2025 | 1:04 AM

टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. रोहितसेनेने अंतिम सामन्यात किवींवर 4 विकेट्सने मात करत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 254 धावा केल्या. टीम इंडियाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी वेळ ठरली. तसेच टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडचा 25 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला.

टीम इंडियाची बॅटिंग

कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या दोघांनी विजयाचा पाया रचला. या दोघांनी 105 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने 17 धावांच्या मोबदल्यात झटपट 3 विकेट्स गमावल्या. शुबमन 31, विराट कोहली 1 आणि रोहित शर्मा 76 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली.

त्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी निर्णायक 61 धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर 48 धावांवर बाद झाला. त्यांनतर अक्षर आणि केएल राहुल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 20 धावा जोडल्या.त्यानंतर अक्षर पटेल 29 धावा करुन माघारी परतला.

त्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 38 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना हार्दिक 18 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाने काही धावा केल्या. त्यानंतर भारताला विजयासाठी 2 हव्या होत्या. तेव्हा रवींद्र जडेजाने 49 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर चौकार ठोकला आणि टीम इंडियाने विजय मिळवला. तर केएल राहुल याने 33 बॉलमध्ये नॉट आऊट 34 रन्स केल्या. तर न्यूझीलंडकडून कॅप्टन मिचेल सँटनर आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कायले जेमीन्सन आणि रचीन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

पहिल्या डावात काय झालं?

दरम्यान त्याआधी टॉस जिंकून न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. डॅरेल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनीा सर्वाधिक धावा केल्या. डॅरेल मिचेल याने 63 तर मायकल ब्रेसवेलने 53 धावांचं योगदान दिलं. रचीन रवींद्र याने 37 तर ग्लेन फिलिप्सने 34 धावा केल्या. तर टीम इंडियसााठी कुलदीव यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. आतापर्यंत एकाही संघाला 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने याआधी 2002 (संयुक्त विजेता) आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर आता 14 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केलीय.

पराभवाची अचूक परतफेड

टीम इंडियाने अंतिम सामन्यात किंवीवर विजय मिळवत 25 वर्षांआधीच्या पराभवाची परतफेड केली. याच न्यूझीलंडने टीम इंडियाला 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. टीम इंडियाने आता किवींना पराभूत करत परतफेड केली.

टीम इंडियाचा दुबईतील 10 वा विजय

टीम इंडियाने या विजयासह दुबईत अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम राखला. टीम इंडियाचा हा या स्टेडियममधील 11 वा सामना होता. भारताचा हा दुबईतील 10 वा एकदिवसीय विजय ठरला. तर एकमेव मॅच टाय झाली होती.

टीम इंडिया 2025 आयसीसी ‘चॅम्पियन्स’

टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ.