
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 सामन्यांची टी 20I मालिका 3-1 अशा फरकाने जिकंली. भारताने यासह टी 20I क्रिकेटमध्ये मालिका जिंकण्याची मालिका कायम राखली. तसेच भारताने 2025 वर्षाचा शेवटही विजयाने केला. त्यानंतर आता टीम इंडिया नववर्षात आणि मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20I सीरिज खेळणार आहे. न्यूझीलंड या दोन्ही मालिकांसाठी भारत दौऱ्यावर (New Zealand tour of India 2026) येणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकांसाठी टीम जाहीर केली आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामन्यांचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंडने या मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. न्यूझीलंडचं एकदिवसीय मालिकेत मायकल ब्रेसवेल नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्याकडे टी 20I मालिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) हा एकदिवसीय संघाचा भाग नाही. केन या एकदिवसीय मालिकेच्या निवडीसाठी उपलब्ध नव्हता. केन दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एसए 20 (SA 20) स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे केन टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याची चर्चा होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.
पहिला सामना, 11 जानेवारी, बडोदा
दुसरा सामना, 14 जानेवारी, राजकोट
तिसरा सामना, 18 जानेवारी, इंदूर
वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मायकल ब्रेसवेल (कॅप्टन), आदि अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेवोन कॉनव्हे, जॅक फॉल्क्स, मिच हे (विकेटकीपर), कायल जेमीसन, निक केली, जेडन लेनॉक्स, डॅरेल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, माइकल रे आणि विल यंग.
पहिला सामना, 21 जानेवारी, नागपूर
दुसरा सामना, 23 जानेवारी, रायपूर
तिसरा सामना, 25 जानेवारी, गुवाहाटी
चौथा सामना, 28 जानेवारी, विशाखापट्टणम
पाचवा सामना, 31 जानेवारी, तिरुवअनंतरपुरम
टी 20I सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमैन, डेव्हॉन कॉनव्हे (विकेटकीपर), जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेनरी, कायल जेमीसन, बेवोन जॅकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, टीम रॉबिन्सन आणि ईश सोढी.