AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : IND vs PAK | हॅरिस रॉफची परत जिरवायला हवी, इशानला आऊट करत पाहत केले चुकीचे हातवारे

IND vs PAK Asia Cup 2023 : पाकिस्तानचा खेळाडू हॅरिस रॉफने चुकीचे हातवारे केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी रॉफला धारेवर धरलं आहे.

Video : IND vs PAK | हॅरिस रॉफची परत जिरवायला हवी, इशानला आऊट करत पाहत केले चुकीचे हातवारे
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 02, 2023 | 7:47 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाचा आणि पाकिस्तानमध्ये सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाला सुरूवातील धक्के देत बॅकफूटवर ढकलल्यानंतर युवा खेळाडू इशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी शतकी भागीदारी करत डाव सावरला. इशान किशन शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना मोठा शॉट मारण्याचा नादात आऊट झाला. त्यावेळी मैदानामध्ये पाकिस्तानचा खेळाडू हॅरिस रॉफने चुकीचे हातवारे केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी रॉफला धारेवर धरलं आहे.

पाहा व्हिडीओ-

टीम इंडियाच्या 4 विकेट गेलेल्या असताना  दबावामध्ये बॅटींगला आलेल्या इशान किशनने पंड्याच्या साथीने डाव सावरला. दोघांनी एकेरी दुहेरी धावा करत स्कोरबोर्ड हलता ठेवला. सर्वात महत्त्वाच म्हणजे या एकेरी दुहेरी धावा घेत असताना जेव्हा मोठा शॉट खेळण्याची संधी मिळेल तेव्हा दोघांनाही मागेपुढे पाहिला नाही.

या धावांमुळे टीम इंडियावरचा दबाव काही प्रमाणात झाला आणि त्यानंतर दोघांनी खुलून बॅटींग केली. अर्धशतक झाल्यावर इशानने पाकिस्तानच्या बॉलर्सवर आक्रमण करायला घेतलं. पठ्ठ्याने 81 बॉलमध्ये 82 धावा केल्या यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकार मारले. हॅरीस रॉफच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला आणि पाकिस्तान संघाने सुटकेटा श्वास घेतला.

दरम्यान, इशानला आऊट केल्यावर हॅरीस रॉफने  निघ इथून मैदानातून चालता हो, अशा अर्थाने चुकीच्या पद्धतीचे हातवारे केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहलीने मारलेले सिक्सक तो बहुतेक विसरलेला दिसतोय. त्याची एकदा जिरवायला हवी अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती