
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानने परंपरेनुसार रडरड सुरु केली आहे. कॅप्टन सूर्याने षटकार ठोकून भारताला विजयी केलं. भारताने सामना जिंकताच सूर्या आणि शिवम दुबे या जोडीने पाकिस्तानच्या खेळाडूंसह हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघून गेली. सूर्याने त्याआधी टॉस दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्यासह हॅन्डशेक केला नाही. यामुळे पाकिस्तानची जगासमोर लाज गेली. त्यामुळे बावचाळलेल्या पीसीबीने अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मॅच रेफरी अर्थात सामनाधिकारीविरोधात आयसीसीचं दार ठोठावलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबीआने आयसीसीकडे महामुकाबल्यातील मॅच रेफरी एन्डी पाईक्रॉफ्ट यांची आशिया कप स्पर्धेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. आयसीसीने पाईक्रॉफ्टला तडकाफडकी हटवावं, अशी मागणी पीसीबीची आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानसोबत हस्तांदोलन टाळलं. त्यासाठी मॅच रेफरी कारणीभूत असल्याचं पीसीबीचं म्हणणं आहे. त्यामुळे मॅच रेफरीला तात्काळ प्रभावाने हटवण्यात यावं, अशी मागणी पीसीबीची आहे.
मॅच रेफरीने नियमांचं उल्लंघन केल्याचं पीसीबीने आयसीसीला दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. तसेच मॅच रेफरीने आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्याचा आरोपही पीसीबीने केलाय. तसेच मॅच रेफरी स्पिरिट ऑफ क्रिकेट संबंधित एमसीसीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही पीसीबीने केला.
पीसीबीच्या या तक्रारीनंतर आता आयसीसीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आयसीसी या तक्रारीवर काय फैसला करते? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष आहे.
टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा दुबईतील 4 टी 20I सामन्यांमधील दुसरा विजय ठरला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 128 धावांचं आव्हान भारताने 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला.
पाकिस्तानची रडरड
Pakistanis are crying that Indian Players didn’t shake hand after Toss or End of Match. pic.twitter.com/g8ml0mInbk
— Ankur Singh (@iAnkurSingh) September 14, 2025
दरम्यान टीम इंडिया विरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाकिस्तानला टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवून सुपर 4 मध्ये सुरक्षितपणे पोहचण्याची संधी होती. मात्र आता पराभवामुळे पाकिस्तानची करो या मरो अशी स्थिती झाली आहे. पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही स्थितीत साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तानसमोर या सामन्यात यूएईचं आव्हान असणार आहे.