
टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली याने आयसीसी चॅम्पियन्स 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात इतिहास घडवला आहे. विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विराटने पाकिस्तानविरुद्ध 14 धावा पूर्ण करताच सचिनला मागे टाकलं आहे. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 14 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फंलदाज ठरला. विराटने सचिनच्या तुलनेत 63 डावांआधी ही कामगिरी करुन दाखवली आहे. तसेच विराट यासह वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार धावा पूर्ण करणारा एकूण तिसरा आणि टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
विराटने पाकिस्तानविरुद्ध 13 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. विराटने यासह 14 धावांचा टप्पा पूर्ण केला. विराटने 299 सामन्यांमधील 287 व्या डावात ही कामगिरी करुन दाखवली आहे. तर सचिनला 14 हजार एकदिवसीय धावा पूर्ण करण्यासाठी 350 डावात बॅटिंग करावी लागली होती. सचिनने आजपासून 19 वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती. सचिनने 6 जानेवारी 2006 रोजी वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार रन्स केल्या होत्या.
सचिन तेंडुलकर, 18 हजार 426 धावा
कुमार संगकारा, 14 हजार 234 धावा
विराट कोहली, 14 हजार धावा
14 हजारी विराट
1⃣4⃣0⃣0⃣0⃣ ODI RUNS for Virat Kohli 🫡🫡
And what better way to get to that extraordinary milestone 🤌✨
Live ▶️ https://t.co/llR6bWyvZN#TeamIndia | #PAKvIND | #ChampionsTrophy | @imVkohli pic.twitter.com/JKg0fbhElj
— BCCI (@BCCI) February 23, 2025
दरम्यान पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तान आणि टीम इंडियाचा हा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. टीम इंडियाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. तर पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलंय.त्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेत टिकून रहायचंय तर टीम इंडियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकावं लागणार आहे. आता टीम इंडिया 242 धावा करुन सलग दुसरा विजय मिळवते की पाकिस्तान तसं करण्यापासून रोखते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.