
मेलबर्न: मागच्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट वर्तुळात एका सामन्याची चर्चा होती. तो सामना म्हणजे (IND vs PAK) भारत विरुद्ध पाकिस्तान. मेलबर्नच्या मैदानात आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) महामुकाबला रंगणार आहे. जगभरातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांचे या सामन्याकडे डोळे लागले आहेत. या मॅचआधी मागच्या दोन-तीन दिवसापासून एका गोष्टीची चर्चा आहे, ते म्हणजे मेलबर्नच (Melbourne) हवामान.
मेलबर्नमध्ये मागच्या दोन दिवसांपासून पावसाची सतंतधार आहे. आज मॅचच्या दिवशी सुद्धा पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता इथे हवामान कसं आहे? ते जाणून घेऊया.
क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी
कालपर्यंत मेलबर्नमध्ये पाऊस कोसळत होता. पण आता पाऊस थांबलाय. असं नाहीय की, आकाश पूर्णपणे निरभ्र आहे. पण काही तासापूर्वी जे वातावरण होतं, त्यापेक्षा आता हवामानात सुधारणा झाली आहे. पाऊस थांबून हवामानात सुधारण झाल्याने भारत-पाकिस्तानचे क्रिकेट चाहते सुद्धा आनंदी आहेत.
आकाशात काळे ढग दाटले आहेत, पण…
सद्यस्थितीत मेलबर्नमधील मॅच सुरु होण्याच्या काहीतास आधी आकाशात काळ्या ढगांची दाटी आहे. चांगली बाब म्हणजे कालच्या सारखा आज पाऊस कोसळत नाहीय. आज पावसाची शक्यता फक्त 20 टक्के आहे.
पराभवाची परतफेड करण्याचा दिवस
मेलबर्नमधील हवामान सुधारल्याने क्रिकेट चाहत्यांना संपूर्ण 20-20 षटकांचा खेळ पहायला मिळेल. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला होता. टीम इंडियावर 10 विकेट राखून पाकिस्तानने विजय मिळवलेला. त्याच पराभवाची टीम इंडियाने आज सव्याज परतफेड करावी, अशी तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.