IND vs PAK : ‘पाक’च्या खेळाडूला लागली मिरची, पोलखोल केल्यानं पाकचा तिळपापड, नेमकं काय घडलं? जाणून घ्या….

ना रन करते है, ना कॅच पकडते है, कमाल है भाई, असं खुद्द पाकिस्तानच्या महिला पत्रकारानं त्यांच्याच क्रिकेट संघावर टीका करताना म्हटलं आणि वादाला तोंड फुटलं. वाचा...

IND vs PAK : पाकच्या खेळाडूला लागली मिरची, पोलखोल केल्यानं पाकचा तिळपापड, नेमकं काय घडलं? जाणून घ्या....
पोलखोल केल्यानं पाकचा तिळपापड
Image Credit source: social
| Updated on: Aug 29, 2022 | 5:19 PM

नवी दिल्ली : आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात (IND vs PAK) पाकिस्तान 5 विकेट्सनं पराभूत झाला. यानंतर पाकिस्तानवर चांगलीच टीकाही झाली. सोशल मीडियावर नेटिझन्सनं पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीवर ताशेरे ओढले. आता हे झालं सोशल मीडियावरचं प्रकरण. पण, पाकिस्तान क्रिकेट संघावर खुद्द पाकिस्तानच्या एका महिला पत्रकारानं टीका केली. ‘ना रन बनाते है, ना कॅच पकडते है,’ असं म्हणत त्या महिला पत्रकारानं तिचाच देश असलेल्या पाकिस्तानला खडेबोल सुनावले. हे होत असताना दुसरी एक घटना याचवेळी घडली. पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraj Ahmed) देखील यावेळी संतापलेला दिसून आला. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेवर बोलताना सरफराजनं भाष्य केलं. मात्र, हरलेल्या पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाल्याचं काल दिसून आलं.

हे ट्विट पाहा

पाकिस्तानला घरचा आहेर

पाकिस्तानच्या महिला पत्रकारानं पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणावर काल प्रश्न उपस्थित केला. फखर जमानने विराट कोहलीचा झेल सोडला नसता, तर परिस्थिती वेगळी असती, असं तीनं म्हटलं. त्याचवेळी तिनं पाकिस्तानच्या फलंदाजांच्या शॉर्ट बॉल्सवर खराब शॉट सिलेक्शनवरही प्रश्न उपस्थित केलेत. पाकिस्तानचे 5 फलंदाज लहान चेंडूंवर बाद झाले, हे देखील तिनं सांगून दाखवलं. यामुळे पाकिस्तानला त्यांच्या देशातून घरचा आहेर मिळत असल्याचं दिसून आलं.

हे ट्विट पाहा

सरफराजचा तिळपापड

सर्फराज अहमदनं ट्विट करून पाकिस्तानच्या पराभवाची कारणमीमांसा केली. त्याचवेळी त्यानं मीडियावरही टीका केली. सर्फराजनं ट्विट करून लिहिले की, ‘पाकिस्तानच्या विरोधात एक गोष्ट झाली की 17 व्या षटकानंतर पाकिस्तानी संघाचे पाच खेळाडू 30 यार्डच्या आत उभे होते. स्लो ओव्हर रेटमुळे हे घडले.’

पाकिस्तानी संघ सावरलाच नाही

पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही. पाकिस्तानची संपूर्ण टीम 147 धावांवर ऑलआऊट झाली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने अखेरच्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सरफराजला टीका आवडली नाही

बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान यांनी छोट्या चेंडूंमध्ये विकेट गमावल्या. हे पाकिस्तानी फलंदाजांचे अपयश होते, त्यामुळे प्रश्न नक्कीच निर्माण होतील. मात्र, ही टीका सरफराजच्या पचनी पडत नाही.