
कुत्र्याचं शेपूट आणि शेजारी पाकिस्तान हे दोन्ही सारखेच आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकडचं राहतं. तसंच पाकिस्तानचंही आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला पुराव्यानिशी जगासमोर उघडं पाडलं. मात्र त्यानंतरही अपवाद वगळता पाकिस्तानी नागरिकांची आणि आजी-माजी खेळाडूंची मस्ती जिरलेली नाही. आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या काही तासांआधी पाकिस्तानच्या खेळाडूने सोशल मीडियावर एक संतापजनक पोस्ट केली आहे.
पाकिस्तानचा ऑलराउंडर खेळाडू आमिर यामिन याने एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आमिरने या पोस्टमध्ये 7-0 असा उल्लेख केला आहे. या 7-0 चा नेमका अर्थ काय? यातून त्याला नक्की काय सुचवायचंय? हे आपण जाणून घेऊयात. मात्र आमिरच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्याची कमेंटच्या माध्यमातून चांगलीच धुलाई केली आहे.
“पाकिस्तान, आज 7-0 करा”, अशा आशयाची एक्स पोस्ट आमिरने केली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये काही महिन्यांआधी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे जशास तसं उत्तर दिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. भारताने पाकिस्तानची दहशतवादी तळं उद्धवस्त केली. मात्र पाकिस्तानचा खोटेपणा काही थांबत नाहीय. खेळाडूंपासून ते नेत्यांपर्यंत पाकिस्तानमधील काही विकृत माणसं खोटे दावे करत सुटले आहेत. पाकिस्तानने भारताचे 6 राफेल विमान पाडल्याचं खोटं पसरवलं जात आहे. मात्र पाकिस्तानकडे याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे पाकिस्तान उघड उघड खोटं बोलतोय हे स्पष्ट आहे.
आमिरनुसार, त्याच्या पोस्टमधील 6 म्हणजे भारताचे 6 राफेल विमान असा त्याचा अर्थ आहे. मात्र ते सपशेल खोटं आहे. यावरुनच भारतावर अंतिम सामन्यात पराभूत करुन तो आकडा 7-0 करा, असा त्या पोस्टचा अर्थ आहे.
पाकिस्तानचा गोलंदाज हरिस रौफस याने या स्पर्धेतील टीम इंडिया विरूद्धच्या गेल्या सामन्यात 6-0 असा इशारा केला होता. आयसीसीने या कृतीमुळे हरिसवर कारवाई केली आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूची संतापजनक पोस्ट
“Pakistan, make it 7-0 today,” Tweets Amir Yamin ✈️💥#TOKInAsiaCup #PAKvIND pic.twitter.com/D2N7pAznsv
— TOK Sports (@TOKSports021) September 28, 2025
दरम्यान आमिर यामिन याने पाकिस्तानचं 4 एकदिवसीय आणि 2 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. आमिरने 2018 साली अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे टीम इंडियाला 7-0 ने पराभूत करा असं म्हणणाऱ्या आमिरचीच 0-7 अशी स्थिती आहे.