AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : आम्ही एकमेकांवर.., गुवाहाटीतील पराभवानंतर शुबमन गिल याची प्रतिक्रिया, कर्णधार काय म्हणाला?

Shubman Gill IND vs SA : शुबमन गिल याला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकावं लागलं. शुबमन दुसऱ्या कसोटीचा भाग असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. मात्र तसं काही झालं नाही. भारताच्या या पराभवानंतर कॅप्टन गिलने सहकाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी खास मेसेज दिला आहे.

IND vs SA : आम्ही एकमेकांवर.., गुवाहाटीतील पराभवानंतर शुबमन गिल याची प्रतिक्रिया, कर्णधार काय म्हणाला?
Shubman GillImage Credit source: PTI
| Updated on: Nov 27, 2025 | 9:56 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाला बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताचा दुसऱ्या कसोटी सामन्यात तबब्ल 408 धावांनी पराभव झाला. भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह भारताला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केलं. भारताला दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या या पराभवानंतर नियमित कर्णधार शुबमन गिल याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शुबमनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

शुबमन गिल याला कोलकातातील इडन गार्डन्समध्ये दुखापत झाली होती. शुबमनला मोठा फटका मारताना मानेवर ताण आला होता. शुबमनच्या मानेला दुखापत झाली. त्यामुळे त्यामुळे शुबमनला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर शुबमला उर्वरित सामन्यात खेळता आलं नाही. तसेच शुबमनला दुसऱ्या कसोटीतही खेळता आलं नाही. त्यामुळे ऋषभ पंत याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र ऋषभ आपल्या नेतृत्वात मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात अपयशी ठरला.

शुबमनची एक्स पोस्ट, कॅप्टनने काय म्हटलं?

अनुकूल परिस्थितीत तुम्हाला झगडावं लागत नाही. मात्र प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करावा लागतो, हे शुबमनने समुद्राचं उदाहरण देत सांगितलं आहे. “शांत असलेला समुद्र तुम्हाला दिशा बदलण्यास भाग पाडत नाही. मात्र वादळच तुम्हाला स्थिर कसं राहायचं हे शिकवतो. आम्ही एकमेकांवर विश्वास कायम ठेवू. एकमेकांसाठी लढू आणि पुढे जावू”, असा विश्वास शुबमनने या पोस्टमधून व्यक्त केला आहे.

गुवाहाटीत भारताचा सर्वात मोठा पराभव

दरम्यान भारताला या मालिकेत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत घोर निराशा केली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 549 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात भारताने 201 रन्स केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव 260 वर घोषित केला. त्यामुळे भारताला 549 रन्सचं टार्गेट मिळालं. मात्र भारताचं 140 धावांवर पॅकअप झालं. भारताने अशाप्रकारे सामन्यासह मालिका गमावली.

शुबमन गिल वनडे सीरिजमधूनही आऊट

दरम्यान शुबमन गिल याला मानेची दुखापत चांगलीच महागात पडली आहे. शुबमनला या मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. शुबमनची दुखापतीमुळे या मालिकेत निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे शुबमनच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारताचं नेतृत्व करणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार