AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA, 1st ODI: अखेर जानेमनची विकेट काढून बुमराहने 925 दिवसांची प्रतिक्षा संपवली

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरहाने (Jasprit bumrah) संघाला एकदम परफेक्ट सुरुवात करुन दिली. त्याने तिसऱ्याच षटकात जानेमन मलानला तंबूत पाठवलं.

IND vs SA, 1st ODI: अखेर जानेमनची विकेट काढून बुमराहने 925 दिवसांची प्रतिक्षा संपवली
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 4:22 PM
Share

पार्ल: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पार्लच्या बोलँड पार्क (Boland park) मैदानावर पहिला सामना सुरु आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरहाने (Jasprit bumrah) संघाला एकदम परफेक्ट सुरुवात करुन दिली. त्याने तिसऱ्याच षटकात जानेमन मलानला तंबूत पाठवलं. टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराह त्याचे दुसरे षटक टाकत असताना मलानला यष्टीपाठी ऋषभ पंतकरवी झेलबाद केले.

बुमराहसाठी खूप महत्त्वपूर्ण विकेट जानेमन मलानचा विकेट बुमराहसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण त्याने वनडेच्या पावरप्लेमध्ये तब्बल दोन वर्ष सात महिने म्हणजे 925 दिवसानंतर पहिली विकेट घेतली. यापूर्वी बुमराहने पहिल्या सहा षटकात शेवटची विकेट 2019 वर्ल्कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये घेतली होती. त्याने मार्टिन गुप्तीलला स्लीपमध्ये झेलबाद केले होते.

पावर प्लेमध्ये 233 चेंडू टाकले

त्यानंतर जानेमन मलानची विकेट घेण्याआधी बुमराहने पावर प्लेमध्ये 233 चेंडू टाकले 170 धावा दिल्या. या दरम्यान 28 वर्षाचा बुमराह मँचेस्टर आणि पार्लमध्ये एकूण नऊ वनडे सामने खेळला. त्यामध्ये त्याने सहा विकेट काढल्या. मलान हा बुमराहचा वनडेमधला 109 वा विकेट होता.

IND vs SA Jasprit Bumrah ends 925 day wait with wicket of Janneman Malan in Paarl ODI

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक