AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: दक्षिण अफ्रिकेच्या ब्रीत्झ्केचं आक्रमक खेळण्याचं गुपित उघड, स्वत:च सांगितलं कसं काय ते

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. दोन सामने पार पडले असून 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दोन्ही सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. मॅथ्यू ब्रीत्झ्केने सांगितलं कसं काय शक्य होतं ते...

IND vs SA: दक्षिण अफ्रिकेच्या ब्रीत्झ्केचं आक्रमक खेळण्याचं गुपित उघड, स्वत:च सांगितलं कसं काय ते
दक्षिण अफ्रिकेच्या ब्रीत्झ्केचं आक्रमक खेळण्याचं गुपित उघडImage Credit source: PTI
| Updated on: Dec 05, 2025 | 4:34 PM
Share

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून दोन्ही सामन्यात भारताने 350 पार धावा केल्या होत्या. पण एकदा दक्षिण अफ्रिकेचा संघ या धावसंख्येच्या जवळ पोहोचला होता. पण विजयी धावांचं लक्ष्य काही गाठू शकला नाही. तर दुसऱ्यांदा 358 धावांचं लक्ष्य 4 विकेट राखून पूर्ण केलं. दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयात एडन मार्करमचं शतक महत्त्वपूर्ण ठरलं. दुसरीकडे, मॅथ्यू ब्रीत्झ्के याची खेळीही महत्त्वाची ठरली. त्याने विजयात मोलाचा हातभार लावला. त्याने या सामन्यात 64 चेंडूत 68 धावा केल्या. रांची वनडे सामन्यातही त्याने 80 चेंडूत 72 धावा केल्या होत्या. मॅथ्यू ब्रीत्झ्के याचा पहिलाच भारत दौरा आहे आणि या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांचा आरामात सामना करत आहे. त्यामुळे इतक्या सहजपणे कसा खेळू शकतो असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्याचं उत्तर आता त्याने स्वत:च दिलं आहे.

मॅथ्यू ब्रीत्झ्के म्हणाला की…

विशाखापट्टणम येथे तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला सामोरं जाताना मॅथ्यू ब्रीत्झ्केने या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याने सांगितलं की, ‘भारतात फलंदाजीचा आनंद लुटत आहे. गोलंदाजांचं मला माहिती नाही. मी पाकिस्तानात खेळून आलो आहे. तिथली खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक नव्हती. पण येथे पाकिस्तानच्या तुलनेत खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे.’ दरम्यान, त्याने दव फॅक्टरही महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित केलं. दक्षिण अफ्रिकेने दोन्ही सामन्यात धावांचा पाठलाग केला. पण रात्री पडणाऱ्या दवामुळे गोलंदाजी करणं कठीण जात आहे. दुसरीकडे, चेंडू आरामात बॅटवर येत आहे. ब्रीत्झ्केचं म्हणणं ऐकता नाणेफेकीचा कौल तिसऱ्या सामन्यात खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करणं हे फायद्याचं ठरेल असंच दिसत आहे.

खालच्या फळीत खेळण्याचा आत्मविश्वास

ब्रीत्झ्केने सांगितलं की, खालच्या फळीत खेळताना आत्मविश्वास मिळतो. मार्को यानसेन आणि कार्बिन बॉश चांगली फलंदाजी करतात. त्यामुळे टॉपच्या चार फलंदाजाना आक्रमक खेळण्याची संधी मिळते. मॅथ्यू ब्रीत्झ्के सध्या फॉर्मात आहे. त्याने 11 वनडे सामन्यात 682 धावा केल्या आहे. यावेळी त्याने 68.2 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार