
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 3 डिसेंबरला होणार आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. भारताने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने केएल राहुल याच्या नेतृत्वात रांचीत 30 नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला होत. त्यामुळे भारताकडे दुसरा सामना जिंकून आघाडी मजबूत करण्याची संधी आहे. या दुसर्या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाने या स्टेडियममध्ये किती सामने खेळलेत? भारताची या मैदानातील कामगिरी कशी आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आतापर्यंत एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकला होता. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2023 साली पहिला आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला होता. रोहित शर्मा याने टीम इंडियाला विजयी केलं होतं. त्यामुळे केएल राहुल याच्याकडे रोहितनंतर भारताला या मैदानात विजयी करण्याची संधी आहे.
भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला होता. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 34.2 ओव्हरमध्ये 108 रन्सवर गुंडाळलं होतं. भारताने हे आव्हान 121 बॉलमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 20.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 111 रन्स केल्या होत्या. भारतासाठी तत्कालिन कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक झळकावलं होतं. रोहितने 51 रन्स केल्या होत्या. तर शुबमन गिल याने 40 धावांचं योगदान दिलं होतं.
रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूरमध्ये मैदानात सलग दुसरं अर्धशतक करणाची संधी आहे. तसेच रोहितने दक्षिण आफ्रकेविरुद्ध पहिल्या सामन्यातही अर्धशतक झळकावलं होतं.
दरम्यान विराट कोहली याने रांचीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 135 धावांची खेळी केली होती. तसेच रोहितनेही 57 धावा केल्या होत्या. विराट-रोहित या जोडीने भारताला विजयी करण्यात प्रमुख योगदान दिलं.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला बुधवारी 3 नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजता नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागणार हे निश्चित होईल.