AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 2nd Odi : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या वेळेत बदल? किता वाजता सुरुवात होणार?

India vs South Africa 2nd Odi Live Streaming : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दुसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना कधी आणि कुठे होणार? तसेच सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या सर्वकाही.

IND vs SA 2nd Odi : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या वेळेत बदल? किता वाजता सुरुवात होणार?
India vs South Africa OdiImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 02, 2025 | 8:54 PM
Share

भारतीय संघाने कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका 0-2 ने गमवावी लागली. त्यामुळे भारतीय संघावर टी 20i मालिकेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान होतं. त्यानुसार भारताने मालिकेत आश्वासक सुरुवात केली. भारताने रविवारी 30 नोव्हेंबरला रांचीत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयी सलामी दिली. आता उभयसंघातील दुसरा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना बुधवारी 3 डिसेंबरला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर टीव्ही9 मराठीच्या https://www.tv9marathi.com या वेबसाईटवर सामन्याबाबत लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवीय सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

रोहित-विराट पुन्हा धमाका करणार?

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताला पहिल्या सामन्यात विजयी करण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली होती. या दोघांनी शतकी भागीदारी केली होती. तसेच विराटने शतक तर रोहितने अर्धशतक झळकावलं होतं. विराटने 135 धावांची खेळी साकारली होती. तर रोहितने 57 धावा केल्या होत्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 349 धावांपर्यंत मजल मारली होती. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला ऑलआऊट 332 धावाच करता आल्या.

Follow Us
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा;
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?