IND vs SL 2nd T20: Hardik Pandya ने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड! ‘हा’ निर्णय टीमवर पडला भारी
IND vs SL 2nd T20: श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव झाला. या पराभवाला हार्दिक पंड्याचा एक निर्णय देखील कारणीभूत आहे.

IND vs SL 2nd T20 Match: भारत आणि श्रीलंकेत सुरु असलेली 3 T20 सामन्यांची सीरीज आता 1-1 अशी बरोबरीत आहे. या सीरीजमध्ये दुसरा सामना हायस्कोरिंग झाला. टीम इंडियाला 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कॅप्टन हार्दिक पंड्याने मॅचच्या सुरुवातीला सर्वांनाच चक्रावून टाकणारा एक निर्णय घेतला. हा निर्णय टीमच्या पराभवासाठी कुठे ना कुठे कारणीभूत आहे. दोन्ही टीम्समध्ये पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर मॅच झाली.
या निर्णयाच सर्वांनाच आश्चर्य वाटलं
भारत आणि श्रीलंकेमध्ये दुसऱ्या T20 सामन्याआधी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर एकूण 20 सामने झालेत. यात 13 मॅचेसमध्ये पहिली बॅटिंग करणारी टीम विजयी ठरली आहे. कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकल्यानंतर पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हार्दिकचा हा निर्णय टीम इंडियावर भारी पडला. टीमला पराभवाचा सामना करावा लागला. अक्षर पटेल-सुर्यकुमार यादवने झुंज दिली. पण त्या बळावर टीम विजयी होऊ शकली नाही. श्रीलंकन टीमला संधी मिळाली. त्यांनी पहिली बॅटिंग करताना धावांचा डोंगर उभारला. श्रीलंकेने 206 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.
बॉलर्स कमी पडले
या मॅचमध्ये टीम इंडियाची गोलंदाजी खूपच खराब झाली. त्यामुळे श्रीलंकेला 206 धावा करता आल्या. मागच्या मॅचचा हिरो शिवम मावी बॉलिंगमध्ये अयशस्वी ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 53 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळाली नाही. टीममध्ये पुनरागमन करणारा अर्शदीप सिंह सुद्धा पराभवाच एक मोठं कारण ठरला. त्याने 2 ओव्हरमध्ये 5 नो बॉल टाकले व 37 रन्स दिल्या. त्याला एकही विकेट काढता आला नाही. उमरान मलिक या मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने 3 विकेट घेतल्या. पण त्यासाठी 48 रन्स मोजले. टॉप ऑर्डर पुन्हा फ्लॉप
207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण भारतीय टीमची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. टीम इंडियाने 57 धावात 5 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे भारताचा 16 धावांनी पराभव झाला. अक्षर पटेल अपवाद ठरला. त्याने तुफान बॅटिंग केली. 31 चेंडूत 3 चौकार आणि 6 सिक्सच्या बळावर त्याने 65 धावा चोपल्या. सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 51 धावांच योगदान दिलं. पण हे दोन प्लेयर्स टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
