AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS SL, 1st Test: रोहित शर्मा-राहुल द्रविड समोर ‘धर्मसंकट’, मोहाली कसोटीत ह्दयावर दगड ठेवून घ्यावा लागणार मोठा निर्णय

IND v SL: भारत आणि श्रीलंकेमध्ये उद्यापासून कसोटी (India vs Srilanka test) मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

IND VS SL, 1st Test: रोहित शर्मा-राहुल द्रविड समोर 'धर्मसंकट', मोहाली कसोटीत ह्दयावर दगड ठेवून घ्यावा लागणार मोठा निर्णय
Image Credit source: twitter
| Updated on: Mar 03, 2022 | 12:58 PM
Share

IND v SL: भारत आणि श्रीलंकेमध्ये उद्यापासून कसोटी (India vs Srilanka test) मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. उद्या मोहालीमध्ये होणारा कसोटी (Mohali Test) सामना भारतासाठी अनेक दृष्टीने खास आहे. कारण कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit sharma) ही पहिलीच टेस्ट आहे तर विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना आहे. विराट कोहलीची 100 वी कसोटी हा भारतीय क्रिकेटमधला एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत संघ निवड करणं, रोहित शर्मासाठी थोडं आव्हानात्मक असेल. संघ निवड करताना रोहित-द्रविड जोडीची डोकेदुखी वाढणार आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्याशिवाय भारतीय संघ कसोटी सामना खेळणार आहे. दशकभरानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ या दोघांशिवाय कसोटी सामना खेळतोय. सततच्या खराब प्रदर्शनामुळे दोघांना संघाबाहेर करण्यात आलं आहे.

पूजारा-रहाणेच्या जागी कोण?

उद्याच्या सामन्यात मधल्याफळीतल्या दोन जागांसाठी तिघांमध्ये चुरस आहे. त्यामुळे रोहित कोणाला निवडतो? त्याची उत्सुक्ता आहे. पूजारा-रहाणे नसल्यामुळे त्यांच्याजागी हनुमा विहारी, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या तिघांपैकी दोघांना संधी मिळू शकते. पूजारा आणि रहाणे ज्या क्रमांकावर खेळायचे, त्या ठिकाणी शुभमन गिल आणि हनुमा विहारीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. चेतेश्वर पुजारा खेळपट्टिवर टिकून रहायचा. प्रतिस्पर्ध्यांना सहजासहजी आपली विकेट बहाल करायचा नाही. तशी फलंदाजी हनुमा विहारी करु शकतो. त्याचा बचाव भक्कम आहे.

श्रेयस अय्यर की शुभमन गिल?

शॉट सिलेक्शनचा विचार केल्यास शुभमन गिल रहाणेसारखी फलंदाजी करु शकतो. रहाणेच्या जागेसाठी गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये स्पर्धा असणार आहे. श्रेयस अय्यर सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याने तीन नाबाद अर्धशतक झळकावली आहेत. त्याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणातही श्रेयसने शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे त्याच्या क्षमतेच्या खेळाडूला ड्रॉप करणं इतकं सोप नाही.

कुठल्या फिरकी गोलंदाला संधी?

रोहित शर्मा मयंक अग्रवाल सोबत सलामीला येईल. केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. लोअर मिडल ऑर्डरमध्ये ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विन आहेत. कुलदीप यादव आणि जयंत यादवमध्ये आणखी एका फिरकी गोलंदाजाला संधी मिळू शकते. उपखंडात सामना असल्यामुळे टीम इंडिया दोन वेगवान गोलंदाजांना संधी देण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह सोबत मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.

अशी असू शकते संभाव्या प्लेइंग XI:

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

IND vs SL Test Series BIG Selection HEADACHE for CAPTAIN Rohit Sharma, who to pick, who to leave out between Gill, Vihari, Iyer?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.