IND vs WI 1st ODI: Video वेस्ट इंडिजने मॅच काढलीच होती, पण संजू सॅमसनच्या या डाईव्हमुळे एका क्षणात मॅच फिरली!

| Updated on: Jul 23, 2022 | 11:10 AM

IND vs WI 1st ODI: वेस्टइंडीज विरुद्ध (IND vs WI) पहिल्या वनडे मध्ये (First ODI) भारताने रोमांचक विजय मिळवला. अवघ्या 3 रन्सनी भारताने हा सामना जिंकला.

IND vs WI 1st ODI: Video वेस्ट इंडिजने मॅच काढलीच होती, पण संजू सॅमसनच्या या डाईव्हमुळे एका क्षणात मॅच फिरली!
ind vs wi
Follow us on

मुंबई: वेस्टइंडीज विरुद्ध (IND vs WI) पहिल्या वनडे मध्ये (First ODI) भारताने रोमांचक विजय मिळवला. अवघ्या 3 रन्सनी भारताने हा सामना जिंकला. भारताचा कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) टॉस हरला होता. त्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 308 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान वेस्ट इंडिजने 305 धावा केल्या. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1-0 ने पुढे आहे. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये खेळला गेलेला हा सामना खूपच रोमांचक ठरला. या सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात लागला. शेवटच्या ओव्हरमध्ये संजू सॅमसनने कमालीची विकेटकिपींग केली.

सॅमसनची डाइव्ह ठरली निर्णायक

वेस्ट इंडिजला अखेरच्या षटकात विजयासाठी 15 धावांची गरज होती. शिखर धवनने चेंडू मोहम्मद सिराजकडे सोपवला. पहिल्या चार चेंडूत शेफर्ड आणि अकील हुसैनने सात धावा केल्या. त्यानंतर पाचवा चेंडू सिराजने वाइड टाकला. हा चेंडू लेग साइडला चाललेला. चेंडू सीमारेषा पार करुन जाईल, असं वाटलं होतं. पण त्याचवेळी विकेटकिपींग करणाऱ्या सॅमसनने शानदार डाइव्ह मारुन चेंडू अडवला. त्यामुळे भारताला अतिरिक्त चार धावा वाचवता आल्या.

सॅमसनने निश्चित केला विजय

असं झालं नसतं, तर वेस्ट इंडिजला शेवटच्या दोन चेंडूत 7 च्या जागी विजयासाठी 3 धावा बनवाव्या लागल्या असत्या. वेस्ट इंडिजने 7 ऐवजी केवळ तीन धावाच केल्या. त्यामुळे भारताने हा सामना 3 धावांनी जिंकला. संजू सॅंमसनने ज्या पद्धतीने चेंडू अडवला, त्याचं सोशल मीडियावर भरपूर कौतुक होतय. हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. सॅमसनच्या डाइव्हने विजय मिळवून दिला, असं फॅन्सचं म्हणणं आहे. काही जण त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत.

सॅमसनची बॅट चालली नाही

सॅमसन कालच्या सामन्यात बॅटने विशेष चमक दाखवू शकला नाही. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. फक्त 12 रन्स त्याने केल्या. रोमारिया शेफर्डच्या चेंडूवर तो पायचीत झाला. सॅमसन फक्त 18 चेंडू खेळला. त्याने छोट्याशा खेळीत एक चौकारही लगावला. बॅटने जमलं नाही. पण त्याने आपल्या विकेटकिपींगच्या कौशल्याने संघाच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. टीम इंडियाच्या विजयात त्या डाइव्हचा महत्त्वाचा रोल आहे.