
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. भारताने दुसऱ्या कसोटीवरही पकड मिळवली आहे. या सामन्याचा शेवटचा दिवस शिल्लक असून भारताच्या हाती 9 विकेट असून विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा सामना भारत जिंकेल असा तमाम क्रीडाप्रेमींना विश्वास आहे. असं असताना या सामन्याच्या चौथ्या दिवशी एक विचित्र प्रकार मैदानात घडला. हा सामना पाहण्यासाठी एक मुलगा आणि मुलगी आले होते. कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या दृश्यानुसार ते मित्र असावेत असा वाटतं. दोघं कॅमेऱ्यात कैद झाले तेव्हा वेस्ट इंडिज मजबूत स्थितीत होता. वेस्ट इंडिजने 4 बाज 293 धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटत होतं. क्रिकेटप्रेमींना चिंतेत टाकणारी स्थिती होती. असं असताना कॅमेरा फिरला आणि एक दृष्य त्यात चित्रित झालं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोघेही सामना पाहात होते. अचानक मुलीने मुलाच्या कानशिलात मारली. असं तिने एकदा नाही दोनदा तीनदा केले.सुरुवातीला काही तरी गंभीर झालं आहे असं वाटलं. रागाच्या भरात मुलीने त्याला मारलं असं वाटलं. पण दोघेही हसताना दिसेल. इतकंच काय तर तिने मस्करीत गळा दाबला. हे दृष्य चित्रित झाल्यानंतर कॅमेरा फिरला आणि पुन्हा सामना सुरु झाला. पण दोघांचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरला आहे. तसेच या दृश्याची चर्चा होत आहे. विकेट पडत नसल्याने मुलीचा संताप झाला असावं असं काही जणांचं सोशल मीडियावर म्हणणं आहे.
Me and Who 😊 pic.twitter.com/oYn8TKbqAC https://t.co/NgDw3F61B9
— Honest Cricket Lover (@Honest_Cric_fan) October 13, 2025
कॅमेरा फिरताच कुलदीप यादवने कमाल केली. 293 धावांवर वेस्ट इंडिजला पाचवा धक्का बसला. कुलदीप यादवने यष्टीरक्षक टेविन इमलाचची विकेट काढली. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर रोस्टन चेसची विकेट काढली. खॅरी पियरेलाही जास्त काळ तग धरू दिलं नाही आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडिजने 311 धावांवर 9 विकेट गमावल्या. पण दहाव्या विकेटने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. त्यांनी 79 धावांची विक्रमी भागीदारी केली आणि संघाला 390 धावांपर्यंत पोहोचवलं. दहावी विकेट पडली आणि भारताला 121 धावांचं आव्हान मिळालं. भारताला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे.