IND vs WI, Predicted Playing XI : आज भारत-वेस्ट इंडिजमध्ये T20 मालिकेचा पहिला सामना, जडेजा खेळणार? दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या…

29 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. त्रिनिदादनंतर दोन्ही संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी सेंट किट्स येथे जाणार आहेत. यानंतर मालिकेतील चौथा सामना होईल.

IND vs WI, Predicted Playing XI  : आज भारत-वेस्ट इंडिजमध्ये T20 मालिकेचा पहिला सामना, जडेजा खेळणार? दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या...
भारत- वेस्ट इंडिजमध्ये T20 मालिकेचा पहिला सामना
Image Credit source: social
| Updated on: Jul 29, 2022 | 7:47 AM

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजने भारत आणि न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs WI) टी-20 (T-20) मालिकेसाठी 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. भारतासोबत (Indian Cricket Team) सुरू होणारी टी-20 मालिका केंट वॉटर प्युरिफायर्सद्वारे चालवली जात आहे. T20 मालिकेतील पहिला सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत खेळवला जाणार आहे. 29 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्रिनिदादनंतर दोन्ही संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी सेंट किट्स येथे जाणार आहेत. यानंतर मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जाईल. भारताविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर कॅरेबियन खेळाडूंचा सामना घरच्या मैदानावर न्यूझीलंडशी होणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. बुधवार 10 ऑगस्ट ते रविवार 14 ऑगस्ट दरम्यान किवी संघाविरुद्धचे सामने होणार आहेत. किवी संघाचे सर्व सामने जमैका येथील सबिना पार्क येथे होणार आहेत.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक:

  1. पहिली T20 – 29 जुलै (त्रिनिदाद)
  2. दुसरी टी20- 01 ऑगस्ट (सेंट किट्स)
  3. तिसरी T20 – 02 ऑगस्ट (सेंट किट्स)
  4. चौथी T20 – 06 ऑगस्ट लॉडरहिल, फ्लोरिडा
  5. पाचवा T20- 07 ऑगस्ट लॉडरहिल, फ्लोरिडा.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक:

  1. पहिला T20 – 10 ऑगस्ट, सबिना पार्क, जमैका
  2. 2रा T20 – 12 ऑगस्ट, सबिना पार्क, जमैका
  3. तिसरा T20 – 14 ऑगस्ट, सबिना पार्क, जमैका

कॅरेबियन स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर आगामी मालिकेसाठी तंदुरुस्त झाला असून, मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच वेळी, शेल्डन कॉट्रेल अजूनही दुखापतीतून सावरत आहे. याशिवाय अष्टपैलू फॅबियन ऍलन आगामी मालिकेत वैयक्तिक कारणांमुळे अनुपलब्ध राहणार आहे.

टीम इंडियामध्ये रविंद्र जडेजा देखील आहे. पण, तो खेळणार की नाही, याबाबत कळू शकलेलं नाही.

असा आहे वेस्ट इंडिजचा 16 सदस्यीय संघ:

निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उप-कर्णधार), शामराह ब्रुक्स, डॉमिनिक ड्रेक, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्‍थमी, डेव्हॉन थॉमस आणि हेडन वॉल्श जूनियर

पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.