IND vs WI | भारताविरुद्ध सीरीजच्या तयारीसाठी वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा

IND vs WI | वेस्ट इंडिजने या सीरीजसाठी कंबर कसली आहे. दोन्ही टीम्समध्ये 2 टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैला आणि दुसरा कसोटी सामना 20 जुलैला खेळला जाईल.

IND vs WI | भारताविरुद्ध सीरीजच्या तयारीसाठी वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा
ind vs wi test series
Image Credit source: twitter
| Updated on: Jun 30, 2023 | 2:09 PM

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पुढच्या महिन्यात 2 टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. भारत या टेस्ट सीरीजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या एडिशनची सुरुवात करणार आहे. वेस्ट इंडिजने या सीरीजसाठी कंबर कसली आहे. 2 टेस्ट मॅचच्या सीरीजसाठी वेस्ट इंडिजची टीम तयारी करणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा होईल.
वेस्ट इंडिजने सीरीजच्या तयारीसाठी 18 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. सर्वच खेळाडू शिबीरात सहभागी होतील.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी सामना 12 जुलैला आणि दुसरा कसोटी सामना 20 जुलैला खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही टीम्समध्ये 3 वनडे आणि 5 T20 सामन्यांची सीरीज खेळली जाईल.


दोन्ही टीमसाठी ही सीरीज खास

कॅरेबियाई टीम एंटीगुआमध्ये तयारी करेल. 9 जुलैला टीम पहिल्या टेस्टसाठी डॉमिनिकाला रवाना होईल. दोन्ही टीमसाठी ही सीरीज खास आहे. सीरीजचा दुसरा सामना या दोन टीम्समध्ये खेळला जाईल. क्रेग बेथवेट टीमच नेतृत्व सांभाळणार आहे.


वेस्ट इंडिजला टीम इंडियाचा कुठला खेळाडू रवाना झाला?

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी टेस्ट आणि वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम आपलं अभियान सुरु करेल. दीर्घकाळानंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेला टेस्ट टीमच व्हाइस कॅप्टन बनवण्यात आलं आहे. तो वेस्ट इंडिजला सुद्धा रवाना झालाय. ऋतुराज गायकवाड़, यशस्वी जैस्वाल यांना टेस्ट टीममध्ये संधी मिळाली.

वेस्टइंडीज स्क्वॉड : क्रेग ब्रेथेवट, एलिक अथानज, जर्मेन ब्लॅकवुड, नक्रूमा बोनर, टी चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डा सिल्वा, शेनॉन ग्रेबियल, केवम हॉज, अकीम जॉर्डन, जायर मैकएलिस्टर, किर्क मॅकेंजी, मार्क्विनो मिंडले, एंडरसन फिलिप, रेमन रीफर, केमार रोच, जेडेन सील्स, जोमेल वारिकन