AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM, 2nd T20: नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला..

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका 2-0 ने जिंकणार आहे. त्यामुळे या सामन्यातील कामगिरीकडे भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

IND vs ZIM, 2nd T20: नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला..
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 25, 2026 | 4:10 PM
Share

भारताने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वेत चांगली सुरूवात केली आहे. खरं तर या मालिकेपूर्वी टीम इंडियावर दडपण होतं. कारण आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 ने, तर इंग्लंडविरुद्धची मालिका 0-4 ने गमावली होती. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना जिंकला आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला. आता भारताला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. कारण तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि कर्णधार सिकंदर रझा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग आठ सामन्यानंतर श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल गमावला आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार होतो. खेळपट्टी थोडी वेगळी दिसतेय. ती पहिल्या सामन्याइतकी चिकट नाही. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी उत्तम असेल याची खात्री करूया. आम्ही हाच संदेश देत आहोत की वर्तमानात राहा, त्या क्षणात राहणे आणि आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ करणे आवश्यक आहे. आमच्या संघात एक बदल आहे.’ टीम इंडियाने संघात एक बदल करत यश ठाकुरला संधी दिली आहे. पहिल्या सामन्यात अशोक शर्मा खेळला होता. मात्र त्याला काही विकेट घेता आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी आता यश ठाकुरला जागा दिली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, मयंक यादव.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन बेनेट, बेन कुरान, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली माधेवरे, तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नागारावा, ब्लेसिंग मुझाराबानी.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान