Test Cricket : रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन कोण? बीसीसीआयकडून स्पष्ट संकेत

India vs New Zealand Test Series 2024 : बीसीसीआयने न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. बीसीसीआयने याद्वारे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत नेतृत्व कोण करणार? याबाबत संकेत दिले आहेत.

Test Cricket : रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन कोण? बीसीसीआयकडून स्पष्ट संकेत
rohit sharma captain team india
Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 12, 2024 | 6:17 PM

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. यानंतर टीम इंडिया मायदेशातच न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी शुक्रवारी 11 ऑक्टोबरला 15 सदस्सीय भारतीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने बांगलादेश विरुद्धचाच भारतीय संघ कायम ठेवला आहे. तसेच ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून चौघांचा समावेश केला आहे. या चौघांमध्ये हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिध कृष्णा समावेश आहे. नेहमीप्रमाणे रोहित शर्माच टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. विशेष बाब म्हणजे जसप्रीत बुमराह याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयने यामधून आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संकेत दिले आहेत.

बुमराह रोहितची जागा घेणार?

टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभयसंघात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पहिल्यांदाच 5 कसोटी सामने खेळणार आहेत. कॅप्टन रोहित शर्मा या मालिकेतील पहिल्या 2 पैकी कोणत्याही एका सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. अशात रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहला नेतृत्वाची संधी मिळू शकते.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 16 ते 20 ऑक्टोबर, बंगळुरु

दुसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे

तिसरा सामना, 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.