
मुंबई : महिला टीम इंडिया आणि महिला इंग्लंड संघामध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्याात भारतीय संघाचा पराभव झाला. टीम इंडियाची फलंदाजी परत एकदा ढेपाळली, इंग्लंड संघाने अवघ्या 80 धावांवर ऑल आऊट केलं. वानखेडे मैदानावर टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव झाला आहे. टीम 9 खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. टीम इंडियाने आता मालिका गमावली असून इंग्लंड संघाने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने हा सामना गमावला तरी टीम इंडियाच्या एका खेळाडूने घेतलेला कॅचने मात्र भारतीयांची मने जिंकली आहेत.
I.C.Y.M.I
𝐒𝐓𝐔𝐍𝐍𝐄𝐑! 🙌 🙌
Relive Amanjot Kaur’s stunning one-handed catch to dismiss Alice Capsey. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/ioHH8Ujek4 #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/X8Jy2Y0Qh6
— BCCI Women (@BCCIWomen) December 9, 2023
भारताने हा सामना हरल्यात जमा होता मात्र शेवटला सबस्टीट्युट म्हणून संघात आलेल्या अमनज्योत कौर हिने कमाल घेत सामन्यात काहीशी रंगत आणली होती. मात्र जिंकण्यासाठी अवघ्या सात ते आठ दहा धावा राहिल्या होत्या. त्यावेळी दिप्ती शर्मा हिने लागोपाठ दोन विकेट घेतल्या होत्या, मात्र तिला हॅट्रीक पूर्ण करता आली नाही.
दरम्यान, इंग्लंड संघाकडून सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत टीम इंडियाच्या डावाला सुरूंग लावला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये महिला भारतीय संघ 2-0 ने पिछाडीवर आहे.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (wk), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (C), एमी जोन्स (Wk), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल