AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

250 धावा करूनही भारत हरला! श्रेयस अय्यरनं पराभवाचं कारणच सांगितलं; कुणावर खापर फोडलं? म्हणाला…

IND vs WI Shreyas Iyer Statement: वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने एकदिवसीय मालिकेतील आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत टी-२० मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यातही शानदार फलंदाजी केली.

250 धावा करूनही भारत हरला! श्रेयस अय्यरनं पराभवाचं कारणच सांगितलं; कुणावर खापर फोडलं? म्हणाला...
| Updated on: Oct 10, 2026 | 12:10 AM
Share

रांचीमध्ये साडेतीन वर्षे उलटूनही भारतीय संघाच्या नशिबात काही बदल झालेला नाही. २०२३ मध्ये याच मैदानावर न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर यावेळी वेस्ट इंडिजकडून भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. जेएससीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने २४९ धावांचा भक्कम डोंगर उभा केला होता. मात्र कर्णधार शाई होपच्या प्रभावी शतकामुळे आणि शेर्फेन रदरफोर्डच्या स्फोटक खेळीमुळे वेस्ट इंडिजने हे लक्ष्य पार केले. एक विक्रम प्रस्थापित केला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

लखनौनंतर रांचीमध्ये फलंदाजांनी धुमाकूळ घातला. तर गोलंदाजांना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागला. यावेळी भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक हे याचे प्रमुख कारण ठरले. मागील सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला होता. कर्णधार श्रेयस अय्यरने शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. यावेळी मात्र चित्र पूर्णपणे वेगळे होते. भारताने नाणेफेक गमावली आणि त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने विजय मिळवला, ज्यात कर्णधार होपने शतक झळकावले. यावर अय्यरने नेमकी चूक कुठे झाली हे सांगितले आहे.

सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यरने या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं किती कठीण होतं, हे स्पष्ट केलं. त्याच्या मते, या खेळपट्टीवर गोलंदाजांकडून होणाऱ्या चुकीला फार कमी वाव होता. एखादा चेंडू योग्य पद्धतीने टाकण्यात अपयश आलं, तर फलंदाज तो थेट सीमापार पाठवत होते. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने आक्रमक फलंदाजी केली, त्याचं श्रेयही अय्यरने त्यांना दिलं. काही ठिकाणी भारतीय संघाच्या हातून संधी निसटल्या आणि काही चेंडूंवर अपेक्षित अंमलबजावणी झाली नाही, असं त्याने मान्य केलं.

मात्र, हा खेळाचाच भाग असल्याचं सांगत त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचं कौतुक केलं. सामन्यात किती धावा केल्या असत्या तर विजय मिळवता आला असता, या प्रश्नावर अय्यरने निश्चित आकडा सांगणं कठीण असल्याचं म्हटलं. दवाचा परिणाम झाल्यानंतर सामन्याचं चित्र बदलू शकतं. याच सामन्यात वेस्ट इंडिजने 249 धावांचं लक्ष्य दोन षटकं शिल्लक असतानाच पूर्ण केलं. त्यामुळे अशा परिस्थितीत किती धावा सुरक्षित ठरतील, याचा अंदाज बांधता येत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.

श्रेयस अय्यरने संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि मयांक यांच्या कामगिरीचंही कौतुक केलं. संजू आणि अभिषेक यांनी सातत्याने जबाबदारी घेत संघाला चांगली सुरुवात करून दिली, असं तो म्हणाला. मयांकने घेतलेल्या तीन महत्त्वाच्या विकेट्समुळे भारतीय संघाला सामन्यातील लय मिळाली होती. मात्र त्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांमधील भागीदारीमुळे सामन्याचा वेग त्यांच्या बाजूने वळला. श्रेयस अय्यरच्या वक्तव्यातून भारतीय गोलंदाजांना या खेळपट्टीवर अचूक गोलंदाजी करणं किती महत्त्वाचं होतं, हे समोर आलं.

दवाचा परिणाम, चेंडू टाकताना झालेल्या चुका आणि वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची आक्रमक भागीदारी या गोष्टी सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकणाऱ्या ठरल्या. मात्र अय्यरने कोणत्याही एका खेळाडूला पराभवासाठी थेट जबाबदार धरलं नाही. त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचं कौतुक करत सामन्यातील चुकांना खेळाचा भाग म्हटलं. भारतासाठी हा पराभव मोठा धक्का ठरला. मोठी धावसंख्या उभारूनही विजय मिळवता आला नाही, त्यामुळे आगामी सामन्यांत गोलंदाजीतील अचूकता आणि दबावाच्या परिस्थितीत योग्य अंमलबजावणी यावर भारतीय संघाला अधिक लक्ष द्यावं लागेल.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...