वैभवच्या फॅन्सनो लक्ष द्या, वाघ आता श्रीलंकेशी भिडणार, पण सेमीफायनलची वेळच बदलली; किती वाजता सुरु होणार?
India A vs Sri Lanka A Semi Final : वैभव सूर्यवंशीने केलेल्या झुंजार खेळीनंतर आता तो पुढील सामन्यात नेमकी कशी खेळी करणार आणि भारताला फायनलला नेणार का? याबद्दल उत्सुकता लागली आहे. त्याचा सेमिफायनलमधील खेळ कसा रंगतो, याकडे लक्ष लागलं आहे. या सामन्याबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात.

यूएईविरुद्ध 52 बॉलमध्ये द्विशतक झळकावून वैभव सूर्यवंशीने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं. आता रायझिंग आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये इंडिया एसमोर श्रीलंका एचं आव्हान आहे. या सामन्याबद्दल आता चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. अनेकांनी सेमीफायनल जिंकून भारत फायनलला जाईल, असाही विश्वास व्यक्त केला आहे.
इंडिया ए आणि श्रीलंका ए यांच्यात रायझिंग आशिया कपचा सेमीफायनल सामना गुरुवारी, 26 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध 52 बॉलमध्ये द्विशतक झळकावत स्पर्धेत धुमाकूळ घातल्यानंतर भारतीय संघाच्या पुढील सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यातही वैभवची बॅट तळपणार का, याची उत्सुकता आहे. मात्र, यूएईविरुद्धच्या सामन्यापेक्षा सेमीफायनलची वेळ वेगळी आहे. त्यामुळे सामना कधी सुरू होणार, टॉस किती वाजता होणार आणि टीव्ही किंवा मोबाईलवर सामना कुठे पाहता येणार, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए सामना कधी सुरू होणार?
रायझिंग आशिया कपमधील इंडिया ए आणि श्रीलंका ए यांच्यातील सेमीफायनल सामना गुरुवारी, 26 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्याला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल, तर टॉस दुपारी 3 वाजता होणार आहे. यापूर्वी यूएईविरुद्ध भारताचा सामना सकाळी सुरू झाला होता. मात्र, सेमीफायनलची वेळ वेगळी ठेवण्यात आली आहे. हा सामना दोहा येथे खेळवला जाणार आहे.
सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?
इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए सेमीफायनल सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर फ्रीमध्ये पाहता येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचे पर्याय उपलब्ध असतील. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी सोनी लिव्ह अॅपवर लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या या सेमीफायनलचा आनंद घेता येणार आहे.
पाकिस्तानशी फायनल होणार?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपापले सेमीफायनल सामने जिंकल्यास पुन्हा एकदा फायनलमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना भारत-पाकिस्तान फायनलची उत्सुकता लागली आहे. मात्र, त्यासाठी आधी इंडिया एला श्रीलंका एविरुद्ध सेमीफायनल जिंकावी लागणार आहे.