IND vs UAE : युएईने आशिया कपसाठी एक खेळाडू भारतातून केला आयात, झालं असं की…

आशिया कप स्पर्धेत भारत आणि युएई यांच्यात पहिला सामना होणार आहे. या सामन्यात तसं पाहिलं तर भारताचं पारडं जड आहे. पण या सामन्यात युएईकडून खेळणाऱ्या भारतीय खेळाडूकडे नजरा खिळल्या आहेत. यापूर्वी त्याने शुबमन गिलला गोलंदाजीदेखील केली आहे.

IND vs UAE : युएईने आशिया कपसाठी एक खेळाडू भारतातून केला आयात, झालं असं की...
IND vs UAE : युएईने आशिया कपसाठी एक खेळाडू भारतातून केला आयात, झालं असं की...
Image Credit source: INSTAGRAM/SIMRANJEET SINGH KANG
| Updated on: Sep 09, 2025 | 11:05 PM

आशिया कप स्पर्धेतील दुसरा सामना यजमान युएई आणि भारत यांच्यात होणार आहे. हा सामना भारत सहज जिंकेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण खेळपट्टीवर कधी कसे फासे पडतील हे सांगता येत नाही. यासाठी युएईने या सामन्यापूर्वी एक डाव खेळला आहे. युएईने भारताच्या डावखुऱ्या फिरकीपटू सिमरनजीत सिंगला संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. मागच्या वर्षी त्याने युएई संघात पदार्पण केलं होतं. 35 वर्षीय सिमरनजीत याचा जन्म पंजाबमध्ये झाला पण काही वर्षांपूर्वी युएईत गेला होता. 2021 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीत एक वेगळच वळण आलं. सिमरनजीत सिंगने 2024 मध्ये युएई आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 5 वनडे आणि 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. सिमरनजीतने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की , ‘ मी शुबमनला लहानपणापासून ओळखतो.

2021 या वर्षी सिमरनजीत प्रॅक्टिस सेशनसाठी 20 दिवस दुबईला गेला होता. पण कोविडची दुसरी लाट आली आणि तो तिथेच अडकला. त्यामुळे काही महिने घरी परतता आलंच नाही. सिमरनजीतने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मी त्या काळात येथेच थांबलो. त्यानंतर ज्युनियर खेळाडूंना ट्रेनिंग दिली, क्लब क्रिकेट खेळलो आणि तीन सीझननंतर युएई संघाचं सेंट्रल काँट्रॅक्ट मिळालं. तिथला नियम त्याच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण खेळाडू तीन सिझन देशांतर्गत क्रिकेट खेळला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास पात्र ठरतो. त्यासाठी त्याला देशाचं नागरिक असणं गरजेचं नाही.

सिमरनजीतने क्रिकेटचे धडे भारतात गिरवले आहेत. त्यामुळे त्याला कमी लेखणं चूक ठरू शकते. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याच्या गाठिशी चांगला अनुभव आहे. सिमरनजीत याने पुढे सांगितलं की, ‘शुबमन गिल त्यावेळी सुमारे 11 ते 12 वर्षांचा असावा. तो नियमितपणे सरावासाठी नेटवर येत असे . मी सराव सत्र संपलं की त्याला खूप गोलंदाजी करायचो . ‘ सिमरनजीतचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न होतं. पण ते काही पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे त्याने गमतीत सांगितलं की,’ माझे स्वप्न भारताकडून खेळण्याचे होते, पण आता मी यूएईकडून खेळत आहे , मला वाटते की माझे कुटुंब यूएईला पाठिंबा देईल .’