AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND-C vs PAK-C Dream11 : भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये युवराजच्या हुकमी एक्क्यांना Dream 11 मध्ये घ्या, पाहा कोण आहेत?

IND-C vs PAK-C Dream11 Prediction : भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याला काही तासांचा अवधी बाकी आहे. या सामन्यात भारताचा कॅप्टन युवराज सिंह आपली बेस्ट 11 घेऊन मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर युवराजच्या हुकमी एक्क्यांना टीममध्ये नक्की घ्या.

IND-C vs PAK-C Dream11 : भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये युवराजच्या हुकमी एक्क्यांना Dream 11 मध्ये घ्या, पाहा कोण आहेत?
| Updated on: Jul 13, 2024 | 5:10 PM
Share

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक असतो. आज पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना होणार असून भारतीय संघाचे जुने खेळाडू दिसणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीग 2024 च्या पहिल्या हंगामामध्ये भारत आणि पाकिस्तानने धडक मारली आहे. युवराज सिंहच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा पराभव करत फायनल गाठली. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या फायनल सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

भारताचा कॅप्टन युवराज सिंह, सुरेश रैना, युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी अर्धशतके केलीत. चौघांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 254 धावांचा डोंगर उभारला होता. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघ 168-7 धावा करू शकला. भारताने 86 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. तर पाकिस्तान संघानेही वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता भारत-पाकिस्तान संघ एकमेकांना भिडणार असून फायनलमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संघात युवराज सिंह याचे दोन महत्त्वाचे हुकमी एक्के म्हणजे युसुफ पठाण आणि इरफान पठाण आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात 37 बॉलमध्ये 95 धावांची महत्त्वाची भागीदारी केली होती. इतकंच नाहीतर दोघांनाही अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी केली.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ड्रीम 11

यष्टिरक्षक – रॉबिन उथप्पा (उपकर्णधार), कामरान अकमल. फलंदाज – शर्जील खान, सुरेश रैना, युसूफ पठाण. अष्टपैलू – शोएब मलिक, युवराज सिंग, इरफान पठाण (कर्णधार). गोलंदाज – वहाब रियाझ, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी.

शोएब मलिक, शर्जील खान आणि कामरान अकमल पाकिस्तानच्या या खेळाडूंना संघात स्थान द्या. फायनलमध्ये या खेळाडूंकडून पाकिस्तान संघाला अपेक्षा असणार आहेत. भारताची बॅटींग धुरळा उडवताना दिसत आहे पण सुरेश रैनाकडून अपेक्षित अशी कामगिरी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या सामन्यात फलंदाजीत चांगल्या कामगिरीची सर्वांनाच असणार आहे.

भारतीय चॅम्पियन संघ

रॉबिन उथप्पा (WK), युवराज सिंग (C), अंबाती रायडू, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण, गुरकीरत सिंग मान, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, आरपी सिंग, नमन ओझा, सौरभ तिवारी, अनुरीत सिंग, राहुल शर्मा

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.