ODI World Cup 2027: वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2027 चे वेळापत्रक जाहीर झाले असून दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमान आहेत. 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत भारत 7 ऑक्टोबरला केपटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

ODI World Cup 2027: वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक
ODI World Cup 2027
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 2:50 AM

आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2027 चे सविस्तर वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर झाले आहे. यंदाच्या या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांकडे सोपवण्यात आले आहे. ही जागतिक स्पर्धा दोन ऑक्टोबरपासून सुरू होऊन 21 नोव्हेंबर 2027 पर्यंत चालणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सात ऑक्टोबरला बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये एकूण पाच सामने खेळायचे आहेत. त्यानंतर सुपर स्टेज आणि नॉकआउट सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे या सामन्यांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना

भारतीय संघ सात ऑक्टोबर 2027 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल. केपटाऊनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना होणार आहे. जोहान्सबर्गमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. यानंतर 14 ऑक्टोबरला भारताचा सामना अफगाणिस्तानशी होईल. त्शवाने येथे हा सामना खेळवला जाणार आहे. 17 ऑक्टोबरला भारतीय संघ क्वालिफायर ए मधून येणाऱ्या संघाविरुद्ध खेळेल. हा सामना ब्लोमफोंटेनमध्ये होणार आहे. ग्रुप स्टेजमधील भारताचा अखेरचा सामना 24 ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध होईल आणि हा सामना व्हिक्टोरिया फॉल्स येथे खेळवला जाणार आहे.

Loading...

ग्रुप स्टेजनंतर सुपर स्टेज

ग्रुप स्टेजमध्ये भारताचा संघ टॉप तीन मध्ये राहिल्यास थेट सुपर स्टेजमध्ये प्रवेश करेल. दोन्ही ग्रुपमधून एकूण सात संघ सुपर स्टेजसाठी पात्र ठरतील. या फेरीत प्रत्येक संघाला आणखी सहा सामने खेळावे लागतील. सुपर स्टेजनंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल आणि विजेतेपदासाठी नॉकआउट सामने रंगतील.

नॉकआउट सामन्यांचे वेळापत्रक

स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना 17 नोव्हेंबरला केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. दुसरा सेमीफायनल 18 नोव्हेंबरला त्शवाने येथे होईल. वर्ल्ड कपचा अंतिम सामना 21 नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला फायनल गाठण्यासाठी आधी ग्रुप स्टेज आणि मग सुपर स्टेज पार करावी लागेल. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांचे केवळ टीम इंडियाच्या खेळाकडे लक्ष असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us