AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Kambli : विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा भयंकर धोका, धक्कादायक माहिती मिळताच सचिनसह सर्वच मित्र मदतीसाठी धावले

Vinod Kambli Friends WhatsApp Group : आपल्या मित्राला गंभीर आजाराचा धोका असल्याचं समजताच अनेक माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मदत करण्यासाठी सरसावले आहेत. कांबळीच्या मित्रांनी मदतीसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे.

Vinod Kambli : विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा भयंकर धोका, धक्कादायक माहिती मिळताच सचिनसह सर्वच मित्र मदतीसाठी धावले
Sachin Tendulkar and Vinod KambliImage Credit source: PTI and Tv9
| Updated on: Apr 15, 2026 | 10:58 PM
Share

सर रमाकांत आचरेकर यांच्या अनेक शिष्यांपैकी एक असलेल्या क्रिकेटर विनोद कांबळी याच्या तब्येतीबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कांबळीची तब्येत बिघडली असून त्याला ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराचा धोका असल्याची माहिती क्रिकेटरच्या मित्राने दिली आहे. आपल्या मित्राला या संकटाच्या काळात आर्थिक आणि मानसिक पाठबळ देण्यासाठी अनेक क्रिकेटपटू सरसावले आहेत. आवश्यक आणि योग्य ती जमवाजमव करता यावी यासाठी कांबळीच्या मित्रांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमधील सदस्यांना मदतीसाठी आवश्यक ती माहिती दिली जात आहे. त्यामुळे मदत मिळवणं सोपं होतं आहे. या ग्रुपमध्ये माजी क्रिकेटपटू आणि कांबळीचा मित्र सचिन तेंडुलकर हा देखील असल्याची माहिती आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने दारु पिणं सोडलं. मात्र कांबळीची स्मरणशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे कांबळीला आपल्याला सिगरेट ओढायची नाही, याचा विसर पडतो. त्यामुळे आता कांबळीला ब्रेन स्टोक्स या गंभीर आजराचा धोका वाढला आहे.

विनोद कांबळी याच्यावर काही महिन्याआधी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर कांबळीच्या तब्येतीत सुधार झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा आता कांबळीच्या तब्येतीने पुन्हा चिंता वाढवली आहे. कांबळीला स्वत:च्या पायावर उभं राहून चालताही येत नाहीय.

कांबळीचा मित्र मार्कस कुटो यांनी क्रिकेटरच्या तब्येतीबाबत माहिती दिली. “कांबळीची स्मरणशक्ती कमी झालीय आहे. कांबळीला भूतकाळातील गोष्टी आठवणं अवघड झालंय. डॉक्टरांनी मेंदूतील नसांबाबत समस्या उद्भवू शकते असा इशारा दिलाय ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकाचा धोका वाढलाय”, अशी माहिती कुटो यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना दिली.

मार्कस कुटो यांनी काय सांगितलं?

मी कांबळीच्या मित्रांचा एक WhatsApp Group बनला आहे. या ग्रुपमध्ये बहुतांश क्रिकेटपटू आहेत. हे खेळाडू आपली ओळख न सांगता कांबळीसाठी आर्थिक मदत करत आहेत”, असं कुटो यांनी सांगितलं.

“विनोदची स्मरणशक्ती फार चांगली नाही. मात्र गेल्या 6 महिन्यांत स्मरणशक्ती कमी झालेली नाही. विनोदला फार काही आठवत नाही. मात्र एखादी गोष्ट त्याला अचानक आठवते. मात्र इतर वेळेस त्याला काही गोष्टी आठवणं फार आव्हानात्मक ठरतं”, असंही कुटो यांनी नमूद केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...