भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यापूर्वी विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, संघातील इतर खेळाडू आश्चर्यचकीत!

भारत पाकिस्तान सामन्यात क्रिकेटपटूंना एक वेगळंच दडपण असतं. या सामन्यात सर्वोत्तम देण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असतो. अशा स्थितीत विराट कोहलीचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. बांगलादेशविरुद्धही काही खास करू शकलेला नाही. अशा स्थितीत विराट कोहलीने सामन्याआधी एक पाऊल उचललं आणि संघ सहकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यापूर्वी विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, संघातील इतर खेळाडू आश्चर्यचकीत!
| Updated on: Feb 22, 2025 | 6:32 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडियाने विजयाने सुरुवात केली. भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला की थेट उपांत्य फेरीत स्थान पक्कं होणार आहे. त्यामुळे जर तरची लढाई करण्यापेक्षा थेट उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं भाग आहे. 23 फेब्रुवारीला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी विराट कोहलीने एक मोटा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या करण्यास मदत होणार आहे. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मात असल्याचं दिसून आलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने निराश केलं. त्याला फक्त 22 धावांची खेळी करता आली. इतकंच काय तर त्याला खातं खोलण्यासाठी 10 चेंडूंचा सामना करावा लागला. यावरून त्याच्यावर किती दबाव आहे हे दिसून येत आहे. तसेच 35व्या चेंडूवर एकमेव चौकार मारला.

विराट कोहलीचे मागचे सहा डाव पाहिले तर त्यात फक्त एकच अर्धशतक ठोकलं आहे. 24, 14, 20,5,52 आणि 22 अशी खेळी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर मिळावा यासाठी त्याने चांगलाच घाम गाळला. विराट कोहली ठरलेल्या वेळेच्या 90 मिनिटं आधीच सराव शिबिरात गेला. असिस्टंट कोच अभिषेक नायरसोबत मैदानात हजेरी लावली. कोहलीने सराव शिबिरात स्थानिक गोलंदाजांचा सामना केला. यावेळी त्याने चांगले ड्राईव्ह मारले. तसेच बचावात्मक खेळण्यावर भर दिला. त्यामुळे विराट कोहलीच्या डोक्यात बरंच काही सुरु असल्याचं दिसत आहे. आता विराट कोहलीला पुन्हा एकदा जुना फॉर्म गवसतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान संघ: बाबर आझम, इमाम-उल-हक, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ, अबरार अहमद, कामरान गुलाम, फहीम अश्रफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान.