IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध ‘या’ 4 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी, अशी असेल संभाव्य Playing 11

वेस्ट इंडिजला (IND vs WI) वनडे आणि टी 20 सीरीज मध्ये हरवल्यानंतर टीम इंडियाची नजर आता आशिया कप (Asia Cup) वर आहे. आशिया कप जिंकणं भारतासाठी इतकं सोपं नसेल.

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध या 4 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी, अशी असेल संभाव्य Playing 11
rohit-hardik
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 09, 2022 | 12:45 PM

मुंबई: वेस्ट इंडिजला (IND vs WI) वनडे आणि टी 20 सीरीज मध्ये हरवल्यानंतर टीम इंडियाची नजर आता आशिया कप (Asia Cup) वर आहे. आशिया कप जिंकणं भारतासाठी इतकं सोपं नसेल, कारण भारताच्या मार्गात मुख्य अडथळा पाकिस्तानचा (Pakistan) असेल. मागच्या सामन्यात पाकिस्तानकडून भारत पराभूत झाला होता. पण आता बदला घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. भारताने आशिया कपसाठी कमालीचा संघ निवडला आहे. त्यात एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. आता प्रश्न हा आहे की, पाकिस्तान विरुद्ध कुठल्या 11 खेळाडूंना संधी मिळेल?.

राहुल-रोहितची जोडी ओपनिंगला येणार

भारताला पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. 28 ऑगस्टला ही लढत होईल. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुलची जोडी सलामीला येईल. केएल राहुल बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन करतोय. रोहित शर्माला सुद्धा सूर गवसला आहे. तो आधीपेक्षा जास्त आक्रमक दिसतोय. विराट कोहलीच सुद्धा टीम मध्ये पुनरागमन होणार आहे. कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तो नवा उत्साह आणि जोश सह मैदानात उतरणार आहे.

मधलीफळी बळकट

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मधली फळी ऋषभ पंत, हार्दिक पंड्यावर अवलंबून असेल. फिनिशरचा रोल दीपक हुड्डाला मिळू शकतो. दीपक हुड्डा यासाठी कारण तो गोलंदाजी सुद्धा करु शकतो. ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जाडेजाला संघात स्थान मिळेल.

गोलंदाजी कशी असेल?

भारताला जसप्रीत बुमराहची उणीव जाणवेल. पण रोहितकडे पर्यायांची कमतरता नाहीय. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह हे वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. युजवेंद्र चहलही आपल्या फिरकीची कमाल दाखवेल.
पाकिस्तान विरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल, रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह.