
मुंबई: बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीची आज म्हणजे सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या संदर्भात ही बैठक होणार आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सोमवारी दुपारी सिलेक्टर्सची बैठक होत असल्याची माहिती दिली. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आज संघ निवड होणार का? त्याबद्दल त्यांनी खुलासा केलेला नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप खेळणार आहे. “टी 20 वर्ल्ड कपसाठी आजच संघ जाहीर होणार का? याबद्दल आता मी सांगू शकत नाही. पण सिलेक्टर्स आज दुपारी भेटणार आहेत” असं धुमल इनसाइडस्पोर्टला म्हणाले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी सुद्धा टीम आज निवडली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
बीसीसीआय पदाधिकाऱ्याच हे वक्तव्य अजिबात आश्चर्यकारक नाहीय. याआधी सुद्धा सिलेक्टर्सची आधी बैठक झालीय. पण टीमची घोषणा दुसऱ्यादिवशी झाली आहे. यावेळी सुद्धा असच होऊ शकतं. सिलेक्टर्सनी वर्ल्ड कपसाठी टीम निवडताना फार विचार मंथन कराव लागणार नाहीय. कारण 90 टक्के टीम जवळपास निश्चित आहे. फक्त तीन ते चार खेळाडूंच्या नावावर विचार होऊ शकतो.
आशिया कपमध्ये टीम इंडिया अपयशी ठरली. त्याच खापर निवड समितीवरही फोडण्यात आलं. वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच मागच्या काही महिन्यांपासून टीम इंडिया सातत्याने टी 20 मालिका खेळत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाने दमदार प्रदर्शन केलं आहे.