
8 मार्च हा दिवस संपूर्ण जगासाठी खूप खास आहे कारण या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांना समर्पित आहे. आजच्या आधुनिक युगात पाऊल ठेवत असताना प्रत्येक क्षेत्रात महिलांनी बाजी मारलेली आहे. ‘हम किसी से कम नही’ म्हणत महिलांनी जगाच्या पाठीवर जात उंच भरारी घेताना दिसताय. त्यात अनेक क्षेत्रात महिला पुढे जात यशाचे शिखर गाठत आहे. अशामध्ये भारतीय क्रिकेटमध्येही अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि कामगिरीतुन जगभरात भारताचा झेंडा उंचावला आहे.
त्यातच जसजसे नवीन आधुनिक युगात पुढे जात आहोत तसतसे भारतीय महिलांमध्ये क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा अनेक महिला क्रिकेटपटू आहेत ज्या जागतिक क्रिकेटमध्ये आपला झेंडा फडकवत आहेत. स्मृती मानधना ते मिताली राज पर्यंत, अशी काही नावे आहेत ज्यांना सध्या कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांनी कमाईच्या क्षेत्रातही उंच भरारी घेतली आहे. चला तर मग तुम्हाला अशा ३ महिला क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.
1. मिताली राज
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने तिच्या कामगिरीने क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप सोडली आहे. तिला सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू मानले जाते. मिताली राजची एकूण संपत्ती सुमारे 40 ते 45 कोटी रुपये असल्याचे सांगितले जातंय. मितालीने भारतासाठी 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या आकड्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की मिताली राज या महिला क्रिकेटपटूंमध्ये किती क्षमता असेल.
2. स्मृती मानधना
मिताली राजनंतर भारतातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूचे नाव स्मृती मानधना यांचे येते. रिपोर्ट्सनुसार, त्यांची मालमत्ता सुमारे 33 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जातंय. क्रिकेट व्यतिरिक्त त्या ब्रँड एंडोर्समेंटद्वारे देखील चांगली कमाई करतात. स्मृतीने भारतासाठी ७ कसोटी, ९७ एकदिवसीय आणि 148 टी-20 सामने खेळले आहेत.
3. हरमनप्रीत कौर
भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर कमाईच्या बाबतीत खूप पुढे आहे. रिपोर्ट्सनुसार, हरमनप्रीतची कमाई सुमारे 23 ते 26 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ती बूस्ट, एचडीएफसी लाईफ आणि सीईआरटी टायर्सची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तिने 3 कसोटी, 141 एकदिवसीय आणि 178 टी-20 सामने खेळले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटची गतिशीलता बदलली असल्याने महिला क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे, ज्यामुळे महिला क्रिकेटपटूंचा खेळ खेळण्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. संपत्ती आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या बाबतीत या महिला क्रिकेटपटूंचे स्थान भारतातील महिला क्रिकेटसाठी त्यांची वाढ, मान, मान्यता आणि पाठिंबा दर्शवते.