IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी टीम इंडिया आणखी 2 सामने खेळणार!

India Tour Of England 2025 : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मात्र त्याआधी आणखी 2 सामने होणार असल्याचं समोर आलं आहे.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी टीम इंडिया आणखी 2 सामने खेळणार!
Gautam Gambhir Rohit Sharma And Virat Kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 18, 2025 | 6:28 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर आता साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे आयपीएल 18 व्या मोसमाकडे (IPL 2025) लागून आहे. त्याआधी टीम इंडियाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी आणखी 2 सामने खेळणार आहे. टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतर लागलीच टीम इंडिया या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना किमान 2 सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडिया ए च्या शॅडो टूरला जूनमधील पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होईल. या संघात टीम इंडियातील मुख्य खेळाडूंचाही समावेश असेल. तसेच या खेळाडूंसह हेड कोच गौतम गंभीर उपस्थित असणार आहेत.

टीम इंडियाचा शॅडो टूर

आयपीएलच्या 18 व्या मोसमाची 25 मे रोजी सांगता होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. टीम इंडियाची ह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील चौथ्या साखळीतील पहिलीच मालिका असणार आहे. टीम इंडियाच्या या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. या मालिकेच्या दृष्टीने 2 सराव सामने हे निर्णायक ठरणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 4 जूनपासून 4 दिवसीय सराव सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर इन्ट्रा स्क्वाड मॅच खेळवण्यात येईल. तसेच त्यानंतर इंडिया विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातील दुसरा सराव सामना पार पडेल.

निवड समितीकडून अनेकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना सराव सामन्यांत संधी देण्यात आली आहे. मात्र प्रमुख खेळाडूंचा सराव ही देखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंचाच इंडिया ए संघात समावेश असेल, अशी शक्यता आहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 20 ते 24 जून, लीड्स

दुसरा सामना, 2 ते 6 जुलै, बर्मिंगघम

तिसरा सामना, 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स

चौथा सामना, 23 ते 27 जुलै, मँचेस्टर

पाचवा सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, लंडन

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीही टीम इंडिया विरुद्ध इंडिया ए यांच्यात काही सामने खेळवण्यात आले होते. तसेच आयपीएलनंतर थेट भारतीय संघाला रेड बॉलने (कसोटी क्रिकेट) खेळायचं आहे. तसेच बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कामगिरी पाहता या इंडिया ए च्या सामन्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे.