वर्ल्ड कप हुकला आता ज्युनिअर संघ सज्ज, भारताच्या सामन्यांची संपूर्ण यादी

Team India U19 asia cup 2023 सीनिअर टीम वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावता उंचावता राहिली, आता ज्युनिअर टीम आशिया कपची ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

वर्ल्ड कप हुकला आता ज्युनिअर संघ सज्ज, भारताच्या सामन्यांची संपूर्ण यादी
आशिया कपनंतर आता चॅम्पियन ट्रॉफी 2025 वरून रणकंदन, टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही?
| Updated on: Nov 25, 2023 | 8:56 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 झाला असून आता भारतीय संघाची कांगारूंविरूद्ध टी-20 मालिका सुरू आहे. यामधील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. अशातच बीसीसीआयने आता अंडर 19 मालिकेसाठी संघाची घोषणा केलीये. सीनिअर टीम वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावता उंचावता राहिली, आता ज्युनिअर टीम आशिया कपची ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

भारतीय अंडर 19  संघाने आतापर्यंत आठवेळा आशिया कपची ट्रॉफी जिंकली आहे. यंदा भारतीय संघाकडे आणखी एक संधी आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघामध्ये पंजाबचा खेळाडू उदय सहारन याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.

भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

यंदाच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. 10 डिसेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. पाहा सर्व सामन्याचं टाईम टेबल. 8 डिसेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 10 डिसेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, 12 डिसेंबर – भारत विरुद्ध नेपाळ, 15 डिसेंबर – दोन्ही उपांत्य फेरीचे सामने, 17 डिसेंबर – अंतिम सामना

 

अंडर 19 आशिया कपसाठी भारतीय संघ

अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (c), अरावेली अवनीश राव (wk), सौम्य कुमार पांडे (vc), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (wk) धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.