28, 47 आणि 34… बाप तैसा बेटा? सेहवाग आणि द्रविडच्या मुलांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी नेमकी कशी? जाणून घ्या

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघांमधील तिसरा वनडे सामना राजकोटमध्ये खेळवण्यात आला. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 254 धावा केल्या.

28, 47 आणि 34... बाप तैसा बेटा? सेहवाग आणि द्रविडच्या मुलांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी नेमकी कशी? जाणून घ्या
Aryaveer Sehwag Anvay Dravid U19
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 5:09 PM

वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या दोघांचे मुलं आर्यवीर आणि अन्वय यांच्याबद्दल अनेक दिवसांपासून क्रिकेटविश्वामध्ये चर्चा आहे. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर 19 सीरिजमध्ये सामना पार पडला. या दोघांनाही या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली आहे. दोघांची कामगिरी कशी राहिली याबद्दल जाणून घेऊयात..

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या अंडर 19 संघांमध्ये आज तिसरा वनडे सामना खेळवला गेला. हा सामना राजकोटमध्ये पार पडला. भारतीय संघाने या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने आपल्या नावावर केले आहेत. आजच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 254 धावांचा डोंंगर उभारला. ज्यामध्ये जेड हॉलिक याने 87धावा ठोकल्या. भारताच्या मनल चौहान आणि मोहित उल्वा याने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. त्यानंतर धावसंख्या उभारण्यासाठी आलेल्या वीरेंद्र सेहवागच्या मुलाने म्हणजेच आर्यवीर सेहवाने लक्ष्य रायचंदानी याच्याबरोबर मिळून भारताला ओपनर म्हणून एक चागंली सुरुवात करुन दिली.

परंतू आर्यवीर सेहवागला त्याचा खेळ जास्तवेळ दाखवता आला नाही. त्याने 31 चेंडू खेळत 34 धावा बनवल्या. त्याच्या खेळीमध्ये 5 चौकारांचा समावेश होता. तर त्याचा स्ट्राइक रेट 109.67 होता.

दरम्यान, आर्यवीरच्या या मालिकेतील एकूण कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने 18 सप्टेंबरच्या राजकोटमधील सामन्यामध्ये 28 धावा ठोकल्या होत्या. तर 21 सप्टेंबर रोजीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने 47 धावांची शानदार खेळी केली. पण त्याला त्याचे अर्धशतक मात्र पूर्ण करता आले नाही.

एकूणच विचार केला तर आर्यवीरने तिन्ही सामन्यामध्ये मिळून 109 धावांची खेळी केली. दरम्यान 18 वर्षांच्या आर्यवीरच्या वनडे पदार्पणाच्या हिशोबाने पाहिले तर त्याची कामगिरी काही निराशाजनक मानता येणार नाही. परंतू चाहत्यांना आणखी चांगल्या धमाकेदार कामगिरीची अपेक्षा मात्र नक्कीच होती. वडिलांसारकीच धमाकेबाज तोडफोड फलंदाजीची अपेक्षा क्रिकेटप्रेमी करत होते.

दुसरीकडे राहुल द्रविडच्या मुलाच्या कामगिरीविषयी बोलायचं झाल्यास त्याला या मालिकेमध्ये केवळ दोनच सामन्यांमध्ये खेळता आले आहे. त्यामुळे 17 वर्षांच्या अन्वय द्रविडने पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यामध्ये 9 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात त्याला बाकावरच बसवलं. त्यामुळे आता वनडे सामन्याच्या मालिकेमध्ये दोघांचीही कामगिरी नेमकी कशी राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

India U19 vs Australia U19 Aryaveer Sehwag 34 runs in third t20 match Know About Anvay Dravid Performance

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us