
सेंच्युरियनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद 94 धावा झाल्या आहेत. भारताने दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने लढाऊ बाणा दाखवला. शेवटच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेऊन भारतीय संघाला दिलासा दिला. कर्णधार डीन एल्गर (52) अजूनही खेळपट्टीवर आहे, ही दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली बाब आहे. भारताच्या विजयाच्या मार्गातील तोच मुख्य अडथळा आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 6 विकेटची गरज असून दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 211 धावा करायच्या आहेत.
भारतीय संघ : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
द. आफ्रिकेचा संघ : डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रासी वॅन डर डुसॅ, टेंबा बावुमा, क्विंटन डिकॉक, वियान मुल्डर, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी निगीडी, मार्को जॅनसेन
केशव महाराज आठ धावांवर बाद. चौथ्यादिवस अखेर दक्षिण आफ्रिका चार बाद 94, डीन एल्गर नाबाद (52)
अखेस जसप्रीत बुमराहने कर्णधार डीन एल्गर आणि रस्सी वॅन डेर डूसनची जमलेली जोडी फोडली. रस्सी वॅनला (10) धावांवर बुमराहने क्लीन बोल्ड केले. आता एल्गर (47) आणि केशव महाराज खेळपट्टीवर आहे.
कर्णधार डीन एल्गर (42) आणि रस्सी वॅन डेर डूसनची (10) जोडी जमली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद 71 धावा झाल्या आरहेत. शार्दुल ठाकूर आपल्या पहिल्या स्पेलमध्ये प्रभाव पाडू शकला नाही.
दुसऱ्या डावात 21 षटकानंतर शार्दुल ठाकूरला गोलंदाजीसाठी आणले आहे. जसप्रीत बुमराहचा दुसरा स्पेल जबरदस्त होता. त्याने आफ्रिकेच्या फलंदाजांना खूप सतावले पण विकेट मिळाला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद 59 धावा झाल्या आहेत. कर्णधार एल्गर 31 आणि Rassie van der Dussen 9 धावांवर खेळत आहे.
टी-ब्रेकनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला दिला दुसरा धक्का. किगन पीटरसन (17) धावांवर बाद. मोहम्मद सिराजने यष्टीरक्षक पंतकरवी केले झेलबाद.
चौथ्या दिवसाचा दुसऱ्या सत्राचा खेळ संपला असून दक्षिण आफ्रिकेने दुसरी विकेट पडणार नाही, याची काळजी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 22 धावा झाल्या आहेत. एल्गर 9 आणि पीटरसन 12 धावांवर खेळत आहे.
दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट गेली आहे. मोहम्मद शामीने सलामीवीर एडेन मार्करामला अवघ्या एक रन्सवर आऊट केले.
दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांची हाराकिरी कायम राहिली. भारताचा दुसरा डाव 174 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य दिले आहे.
सात विकेट गमावून भारताने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताकडे सध्या 281 धावांची आघाडी आहे. ऋषभ पंत (19) आणि मोहम्मद शामी खेळत आहे.
चेतेश्वर पुजारा (16) आणि अजिंक्य रहाणे (20) धावांवर बाद झाला आहे. सध्या भारताच्या सहा बाद 131 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन मैदानावर आहेत.
भारताने ओलांडला 100 धावांचा टप्पा, भारताच्या सध्या 109/4. विराट बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात. अजिंक्य (20) आणि पुजारा (16) धावांवर खेळतोय.
सेंच्युरियन कसोटीत भारताला मोठा झटका बसला आहे. कर्णधार विराट कोहली (18) धावांवर बाद झाला आहे. त्याला जॅनसेनने क्विंटन डि कॉककरवी झेलबाद केले. विराट कोहली आज पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.
सध्या चेतेश्वर पूजारा आणि विराट कोहलीची जोडी मैदानावर आहे. पूजारा (12) आणि विराट (18) धावांवर खेळत आहे. भारताच्या तीन बाद 79 धावा झाल्या आहेत.
केएल राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला असून सध्या तो आणि पूजारा मैदानावर आहे. पूजारा 8 आणि कोहली 14 धावांवर खेळत आहे.
भारताला तिसरा धक्का बसला आहे. लोकेश राहुल 23 धावांवर बाद झाला आहे. निगीडीने एल्गरकरवी त्याला झेलबाद केले.
दोन विकेटच्या मोबदल्यात भारताच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. राहुल 19 आणि चेतेश्वर पूजारा 7 धावांवर खेळत आहे.
1ST TEST. 18.3: L Ngidi to K L Rahul (19), 4 runs, 50/2 https://t.co/g5Y4COxn28 #SAvIND
— BCCI (@BCCI) December 29, 2021
केएल राहुलने चौकार लगावला आहे. राहुलचा डावातील हा तिसरा चौकार आहे.
भारताला दुसरा धक्का, शार्दुल ठाकूर 10 धावांवर बाद, राबाडाने म्युलडरकरवी केले झेलबाद.
10 व्या षटकात मार्को यान्सिनच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकूरने शानदार षटकार लगावला. शार्दुल आज वेगाने धावा जमवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे, असे दिसतेय. (भारत 28/1)
भारतीय संघ आज आपला दुसरा डाव पुढे नेणार आहे. संघाकडे 146 धावांची आघाडी आहे. भारतीय संघ किमान 300 धावांचा टप्पा पार करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी केवळ पहिल्या दोन सत्रांमध्ये फलंदाजी करेल, जेणेकरून दक्षिण आफ्रिकेला गुंडाळण्यासाठी त्यांना वेळ आणि पुरेशा धावा आणि गोलंदाजीसाठी षटकं मिळतील.
Good Morning from SuperSport Park ?
Huddle Talk ?️ done ☑️
We are all set for Day 4 action to get underway ?#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/gsGz51PoOD
— BCCI (@BCCI) December 29, 2021