
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 6 गडी गमवून पूर्ण केलं. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचणयाची सलग तिसरी वेळ ठरली हे. आता अंतिम फेरीचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. आता टीम इंडियासमोर अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील विजयी संघाशी लढत होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 265 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 4 गडी राखून पूर्ण केलं. यासह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात विराट कोहलीची खेळी निर्णायक ठरली. खरं तर या मैदानावर 265 धावांचं लक्ष्य गाठणं कठीण होतं. पण टीम इंडियाने विजय मिळवून दाखवला. या विजयासह टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप पराभवाच्या जखमेवर मलम चोळलं आहे. भारताने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. 2013 मध्ये जेतेपद, 2017 पाकिस्तानकडून पराभव आणि आता पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे. भारताचा अंतिम फेरीत सामना न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
हार्दिक पांड्या 28 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. टीम इंडियाला विजयासाठी 6 धावांची गरज आहे.
केएल राहुलने वनडे क्रिकेटमध्ये 3000 धावांचा पल्ला गाठला आहे.
टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने 98 बॉलमध्ये 84 रन्स केल्या.
टीम इंडियाने 200 धावा पूर्ण केल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी आणखी 65 धावांची गरज आहे. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानात खेळत आहेत.
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. नॅथन एलीस याने ऑलराउंडर अक्षर पटेल याला बोल्ड केला आहे. अक्षरने 30 बॉलमध्ये 27 रन्स केल्या.
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. एडम झॅम्पा याने श्रेयस अय्यर याला क्लिन बोल्ड केलं श्रेयसने 62 बॉलमध्ये 45 रन्स केल्या.
टीम इंडियाने 265 धावांचा पाठलाग करायला आल्यानंतर ठराविक अंतराने 2 विकेट्स गमावल्या. उपकर्णधार शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा ही सलामी जोडी माघारी परतली. त्यानंतर आता श्रेयस अय्यर आणि विराट कोहली या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर या जोडीकडून मोठी भागीदारी करावी लागणार आहे.
टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा 28 धावा करून तंबूत परतला आहे.
शुबमन गिलच्या रुपाने टीम इंडियाला पहिला धक्का बसला. अवघ्या 8 धावा करून शुबमन गिल बाद झाला आहे.
कर्णधार रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले. भारतासमोर 265 धावांचं आव्हान असताना रोहित शर्माचं असं खेळणं पाहून क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारी आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली आहे. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपला हेतू स्पष्ट केला आहे.
आस्ट्रेलियाने सर्व गडी गमवून 264 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खरं तर हे आव्हान सोपं वाटत असलं तरी दुबईच्या खेळपट्टीवर वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे.
एलेक्स कॅरीच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरने त्याला धावचीत केलं.
ऑस्ट्रेलियाने सातवी विकेट गमावली आहे. वरुण चक्रवर्ती याने Ben Dwarshuis याला 19 धावांवर श्रेयस अय्यर याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स कॅरी याने टीम इंडियाविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
अक्षर पटेल याने स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला 7 रन्सवर क्लिन बोल्ड केलंय. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे सहावी विकेट गमावली
आणि टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं आहे.
मोहम्मद शमी याने ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका दिला आहे. शमीने डायरेक्ट बॉलवर स्मिथला 73 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलियाला आणखी एक झटका दिला आहे. जडेजाने मार्नस लबुशेन याच्यानंतर जोस इंग्लिस याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. जडेजाने इंग्लिसला 11 रन्सवर विराट कोहली याच्या हाती कॅच आऊट केलं.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला आहे. रवींद्र जडेजा याने मार्नस लबुशेन याला 29 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं.
आयआयटी बाबानं भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याबाबत भविष्यवाणी केली होती. पाकिस्तान जिंकणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांची ही भविष्यवाणी खोटी ठरली होती. आता आज ऑस्ट्रेलिया जिंकणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडच्या रुपात दुसरी विकेट गमावल्यानंतर मार्नस लबुशेन मैदानात आला. त्यानंतर लबुशेनने आतापर्यंत कर्णधार स्टीव्हन स्मिथ याला चांगली साथ दिली आहे. ही जोडी स्थिरावली आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसऱ्या विकेटची प्रतिक्षा आहे.
वरुण चक्रवर्ती याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. वरुणने ट्रेव्हिस हेड याला शुबमन गिल याच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 33 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेडने त्याच्या अंदाजात खेळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हेडला लवकरात लवकर आऊट करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. ऑस्ट्रेलियाने 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 47 धावा केल्या आहेत. यात एकट्या हेडने 26 बॉलमध्ये 33 रन्स केल्या आहेत.
मोहम्मद शमी याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. शमीने कूपर कॉनोली याला झिरोवर विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं. कूपर कॉनोली 9 बॉल खेळून झिरोवर आऊट झाला.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाे टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. कूपर कॉनोली आणि ट्रेव्हिस हेड सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पहिली ओव्हर टाकली. शमीने या पहिल्याच ओव्हरमध्ये हेडचा बॉलिंगदरम्यान कॅच सोडला. त्यामुळे हेडला जीवनदान मिळालं.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली आहे. त्यामुळे आता भारताला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान असेल.
ऑस्ट्रेलियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये एकूण 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 5 पैकी 4 सामने खेळले आहेत. तर कांगारुंचा 1 सामन्यात पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दुबईत अखेरचा एकदिवसीय सामना हा 2019 साली खेळला होता.
टीम इंडियाने आतापर्यंत दुबईत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने दुबईत याआधी 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 मॅच टाय झालीय.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.