Ind vs Eng : 13 नो बॉल, 15 मिनिटांची एक ओव्हर, क्रिकेटच्या पंढरीमध्ये बुमराहची लाजीरवाणी कामगिरी

| Updated on: Aug 15, 2021 | 12:30 PM

26 ओव्हर, 79 धावा आणि 0 विकेट्स… लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात, जसप्रीत बुमराहच्या बोलिंगची ही अवस्था होती. नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजीचा स्टार क्रिकेटच्या पंढरीमध्ये आला आणि त्याने लाजीरवाणी कामगिरी केली.

Ind vs Eng : 13 नो बॉल, 15 मिनिटांची एक ओव्हर, क्रिकेटच्या पंढरीमध्ये बुमराहची लाजीरवाणी कामगिरी
Jasprit Bumrah
Follow us on

Ind vs Eng :  26 ओव्हर, 79 रन्स आणि 0 विकेट्स… लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात, जसप्रीत बुमराहच्या (Jasprit bumrah) बोलिंगची ही अवस्था होती. नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजीचा स्टार क्रिकेटच्या पंढरीमध्ये आला आणि त्याने लॉर्ड्सवर लाजीरवाणी कामगिरी केली. पहिल्या कसोटीत डावात पाच गडी बाद करत 9 बळी घेणाऱ्या बुमराहला दुसऱ्या कसोटीत विकेट्सचा भोपळाही फोडता आला नाही. तो सध्या चर्चेत आहे त्याचं कारण त्याची जुनीच समस्या म्हणजे वारंवार नो फेकणे… लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी एकूण 17 नो बॉल टाकले. त्यापैकी तब्बल 13 नो बॉल जसप्रीत बुमराहने फेकले. याआधी झहीर खानने 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या कसोटीत एका डावात 13 नो बॉल टाकले होते.

लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या डावात 13 नो बॉल टाकलेस्या बुमराहने एकाच ओव्हरमध्ये 4 नो बॉल टाकले. बुमराहची ही ओव्हर 15 मिनिटे चालली. मात्र, याचे कारण केवळ बुमराहची नो-बॉल गोलंदाजीच नाही तर जेम्स अँडरसनची भीती होती. इंग्लंडच्या डावातील हे 126 वे षटक होते. या षटकात बुमराहचा पहिलाच चेंडू अँडरसनच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर कनकशन प्रोटोकॉलमुळे त्याची विचारपूस करण्यात आली, ज्यामध्ये बराच वेळ वाया गेला. मात्र, विचारपूस झाल्यानंतर अँडरसनने पुन्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा जसप्रीत बुमराहची नो-बॉलची मालिका सुरु झाली.

बुमराहची एक ओव्हर 15 मिनिटे चालली!

जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या डावाच्या 126 व्या षटकात चौथा चेंडू, पाचवा चेंडू आणि सहावा चेंडू दोनदा नो बॉल टाकला. अशाप्रकारे त्याने 3 चेंडूंच्या अंतराने चार नो बॉल टाकले. आणि 10 बॉलची एक लांबलचक ओव्हर टाकली. जसप्रीत बुमराहची ही ओव्हर तब्बल 15 मिनिट चालली, ज्यामुळे भारताला मोठा झटका बसू शकतो.

बुमराहचे 13 नो बॉल, भारताला 2 मोठे झटके बसण्याची शक्यता

बुमराहच्या 13 नो बॉल मुळे इंग्लंडला पहिल्या डावात 27 धावांची आघाडी घेण्यास मदत झाली, जी भारतासाठी पुढे धोकादायक ठरु शकते. आणि दुसरे म्हणजे, पुन्हा एकदा टीम इंडियाला स्लो ओवर रेटसाठी दंड ठोठावण्याचा आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणांची संख्या 2 गुणांनी कमी होण्याचा धोका हे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने बुमराहच्या 13 नो-बॉलला पहिल्या डावातील आघाडीसाठी मोठा इम्पॅक्ट मानलं आहे.

(india vs England jasprit bumrah 13 no ball And 15 Minute long Over to James Anderson in Lord test)

हे ही वाचा :

पुजारा आणि अजिंक्य रहाणेला झालंय काय, कुठे चुकतात?, VVS लक्ष्मणने सांगितली ‘मिस्टेक’

इंग्लिश प्रेक्षकांनी राहुलच्या अंगावर बाटलीची झाकणं फेकली, संतापलेल्या विराट कोहलीकडून जशास तसे उत्तर